गांधीनगर :प्रतिनिधी-उचगाव ता. करवीर येथील जेष्ठ चार्टर्ड अकौंटंट संभाजी शंकर पोवार यांचे चिरंजीव युवा चार्टर्ड अकौंटंट रजत संभाजी पोवार यांनी इंटरनॅशनल टॅक्सेशन परीक्षेत (आंतरराष्ट्रीय करप्रणाली) यापरीक्षेत बाजी मारत भारतातून पहिला येण्याचा बहुमान मिळवला आहे.त्याच्या या यशदायी कामगिरी बद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
रजत पोवार हा सेंट झेव्हीअर्स हायस्कुलचा माजी विद्यार्थी असून १० वीच्या परीक्षेत त्याला ९७.८२% गुण मिळाले होते. बीकॉमच्या प्रवेशानंतर त्याने चार्टड अकौंटंट होण्याचे स्वप्न पाहिले आणि परीक्षेची तयारी केली आणि २१ व्या वर्षीच सीए होण्याचा बहुमान त्याने पटकावला आहे. या गगनभरारी यशानंतर इंटरनॅशनल टॅक्सेशन परीक्षेचा अभ्यास सुरू केला.जगभरामध्ये प्राप्तिकरांची स्थिती काय आहे.कोठे काय बदल होत आहेत. याचा सूक्ष्म अभ्यास केला. नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल टॅक्सेशन परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन केले. एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतात पहिला येण्याचा बहुमान त्याने पटकावला आहे. सध्या ते इन्कम टॅक्स अपीलेट ट्रायबूनल पुणेला प्रॅक्टिस करीत आहेत. या प्रॅक्टिसचाही त्यांना या परीक्षेसाठी उपयोग झाला
