भारत स्वातंत्र्यानंतर सर्कलनुसार राज्यांची निर्मिती व्हायला हवी होती परंतु 1950 मध्ये जेंव्हा नवीन तालुक्यांची निर्मिती झाली तेंव्हा कांही पटवारी जहागीरदारांच्या वैयक्तिक स्वार्थ आणि हेवेदाव्यामुळे त्यांनी जानीवपुर्वक चुकीची माहिती देऊन गावांची विभागणी केली. फक्त एकाच ठिकाणी सर्कलनुसार विचार केला बाकी कुठेच हा नियम किंवा विचार पाळला गेला नाही. अशा पध्दतीने पदावरील मतलबी लोकांमुळेच सीमावादाचा जन्म झाला असे मत ईंजि. हरिहर जाधव यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात या चळवळी अंतर्गत पार पडलेल्या २३४ व्या वाचक संवादात प्रसिध्द साहित्यिक , इतिहास संशोधक,तथा सीमाभाग आणि वाद याचे गाढे अभ्यासक ईंजि. हरिहर जाधव यांनी स्वलिखित *Solving the border dispute area between Maharastra and Karnataka: Real facts* या साहित्यकृतीवर संवाद साधताना म्हणाले की, सीमावाद ज्यांना माहित नाही किंवा या विषयावर ज्यांना विशेष माहिती मिळवायची आहे त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे व हा विषय समजुन घेतला पाहिजे. विनाकारणचे वाद करु नयेत असेही ते म्हणाले.
फेसबुक लाईव्ह संपन्न झालेल्या या संवादा नंतर झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदवला.यावेळी मान्यवरांचा ग्रंथभेट व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक अनंत कदम यांनी केले तर आभार मुरलीधर जाधव यांनी मानले.
