कोल्हापूर/प्रतिनिधी : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील १२६ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मार्गी लागणार आहेत . यासाठी ७० कोटी रुपयांची तरतुद करण्यात येणार आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेला राज्य सरकारच्या माध्यमातून ४० टक्के निधी देणार आहेत . अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली .
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा तीनमध्ये हातकणंगले लोकसभा मतदार संघातील १२६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांचा आराखड्यामध्ये समावेश करण्यासाठी प्रस्तावित केले आहे . सदर रस्त्यांची कामे प्राधान्य क्रमानुसार हाती घेण्यात येणार असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले , शिरोळ , शाहूवाडी तसेच सांगली जिल्यातील वाळवा , शिराळा व मिरज तालुक्यातील ग्रामीण व डोंगरी वस्तीतील रस्त्यांच्या बांधणीसाठी भरीव तरतुद करण्यात येणार आहे . रस्ते कामासाठी प्रति किलोमीटर ५५ लाख रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे . रस्त्यांवरील आवश्यक असणाऱ्या छोट्या मोठ्या पुलांची कामेही केली जाणार आहेत . यामुळे अनेक वर्षे रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागणेसाठी मदत होणार आहे . रस्त्यांवरील आवश्यक असणा – या अळ्या मोठ्या पुलांची कामेही केली जाणार आहेत . यामुळे अनेक वर्षे रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागणेसाठी मदत होणार असल्याचेही खासदार माने यांनी सांगितले . तालुकानिहाय रस्त्यांची लांबी हातकणंगले १७ ( किमी . ) वाठार ते लाटवडे – ५.९ ० कि.मी. , भादोले , किणी , ते जुने चावरे- १०.८५ १६ ( किमी . ) कोंडीग्रे ते कुरडे टारे वसाहत ३.६० , दानोळी ते उमळवाड- ३.५ ९ , नांदणी ते तारदाळ- ५.९९ , निमशिरगाव ते चिपरी -३.२० शाहूवाडी ३१ ( किमी . ) सावे सावर्डे ते एमडीआर ०४-३.०० , एनएच १६६ ते परळी -निनाई रोह -५४० , साळशी , सुपात्रे ते वरेवाडी रोड ४.२७ , अमेणी फाटा, कारंडेवाडी ते माणगाव रोड ७.२५ , करंजोशी ते अरुळ ,आंबार्डे शिराळे तर्फ मलकापूर -४४२ , पन्हाळा १ ९ ( किमी . ) एमडीआर ते सुर्वेवाडी , वाघवे, देवठाणे, माजगाव रोड, -३.७० किंमी . वाघजाई मंदिर ते कळंबे ५.०० माले , पोखले , बहिरेवाडी -३.३ ९ २३ ( किमी . ) नेले बहे रोड -५.१० , नागठाणे आष्टा- ५.०० , आष्टा डेक्कन मोलॅसिस रोड ५.०० , वाळवा ते आष्टा रोड -७.६० शिराळा १७ ( किमी . ) खेड धनगरवाडा ते बेलदारवाडी रोड -५.२ ९ , चिखली , पाटील वसाहत शांतीनगर ३.३० , लादेवाडी – देववाडी रोड -५.०६ मिरज ३ ( किमी . ) नांद्रे ते डिग्रज -३.३० , वाळवा पाच वर्षे देखभाल दुरुस्ती सदर रस्त्यांची पहिल्या पाच वर्षांची देखमाल व दुरूस्ती संबंधीत ठ
करण्यात येणार असून पुढील पाच वर्षांची देखभाल – दुरूस्ती ही संबंधित विभागाकडून करण्यात येणार आहे.त्यामुळे किमान १० वर्षे रस्ते सुस्थितीमध्ये राहतील .