कोल्हापूर,: भारतातील सर्वात मोठी स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ इन्शुरन्स प्रचंड वाढीची क्षमता असलेली महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्रातील आपले स्थान आणखी मजबूत करत आहे. महाराष्ट्रात ८८७ शाखांपैकी १०७ शाखा असल्याने राज्य स्टार हेल्थच्या विविधांगी जनतेला सर्वसमावेशक आणि प्रवेशयोग्य आरोग्य सेवा उपाय सुविधा पुरविण्याच्या ध्येयाच्या केंद्रस्थानी आहे. महाराष्ट्रातील १५ लाखांहून अधिक पॉलिसी धारकांना सेवा देणारे १.१५ लाखांहून अधिक एजंट्स आणि २०४० हून अधिक कर्मचाऱ्यांचे मजबूत नेटवर्क यातून ही बांधिलकी प्रतिबिंबित होते. आम्ही राज्यासाठी वचनबद्ध असून आर्थिक वर्ष २४ मध्ये १९०० कोटी रु.च्या दाव्यांची पूर्तता केली आहे आणि गेल्या ५ वर्षांत ७००० कोटी रु.च्या दावे पूर्ण केले आहेत.
स्टार हेल्थ इन्शुरन्सचे मुख्य विपणन अधिकारी हिमांशू वालिया म्हणाले, “महाराष्ट्र हे स्टार हेल्थ इन्शुरन्समधील आमच्या व्यवसायाच्या कार्यपद्धतींचा कणा आहे. येथील विविधांगी जनता आणि प्रगत आरोग्यसेवा परिसंस्थेने आम्हाला सर्वसमावेशक विमा उपायसुविधा वितरीत करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ दिले आहे. आमच्या होम हेल्थकेअर सेवा आणि ब्रेल पॉलिसीची ओळख यासारख्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून नागरिकांसाठी प्रवेशयोग्यता, समावेशकता आणि एकूण आरोग्य सेवा अनुभव सुधारण्याप्रती असलेली आमची बांधिलकी दिसून येते. या महत्त्वाच्या बाजारपेठेला प्राधान्य देऊन, आम्ही महाराष्ट्रातील कुटुंबांच्या आरोग्य आणि कल्याणावर दीर्घकालीन परिणाम करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”
महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण होम हेल्थकेअर सेवा
नवकल्पना आणि सुलभता यांच्याप्रति असलेली बांधिलकी आणखी मजबूत करत स्टार हेल्थ इन्शुरन्स ने ५० हून अधिक शहरांमध्ये पसरलेल्या राष्ट्रीय उपक्रमाचा भाग म्हणून मुंबई आणि पुण्यात आपली होम हेल्थकेअर सेवा सुरू केली आहे. जलद दावे निकाली काढण्यास आणि स्वस्त आणि उच्च-गुणवत्तेची काळजी घेण्यासाठी डिझाइन केलेल्या सेवेसह प्रवेशयोग्यता सुनिश्चित करत ही सेवा ग्राहकांना त्यांच्या घरीच आरोग्यसेवा मिळविण्याची सुविधा देते.
महाराष्ट्राने या सेवेसाठी मजबूत मागणी दर्शवली असून चालू आर्थिक वर्षात एकूण होम हेल्थकेअर कॉलपैकी ४० टक्के कॉल या राज्यातून आले आहेत. सध्या, स्टार हेल्थची होम हेल्थकेअर सेवा महाराष्ट्रातील ८५ टक्के ठिकाणी उपलब्ध आहे आणि ग्रामीण भागातही ही सेवा विस्तृत करून प्रवेशयोग्यता वाढवण्याचे आणि वंचित समुदायांच्या आरोग्यसेवा गरजा पूर्ण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
स्टार हेल्थ इन्शुरन्सद्वारे हाती घेण्यात आलेला आणखी एक आरोग्यस्वास्थ्य उपक्रम म्हणजे माइंड हेल्थ प्रोग्राम आहे. हा उपक्रम ताण, चिंता, पॅनिक अटॅक, ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर आणि खाण्यासंदर्भातील विकारांचा समावेश असलेल्या विविध मानसिक आरोग्य आव्हानांना हाताळण्यास व्यक्तींना सक्षम करण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. मौल्यवान स्त्रोत आणि पाठबळ उपलब्ध करून देत हा कार्यक्रम मानसिक आरोग्याच्या कल्याणासाठी रचनात्मक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन सादर करतो. स्वास्थ्य लाभ समाविष्ट असलेल्या धोरणांसह सर्व ग्राहकांसाठी समर्पित माइंड हेल्थ वेलनेस प्रोग्राम सादर करणारी स्टार हेल्थ ही पहिली विमा कंपनी आहे.
स्टार हेल्थ राज्यात आपला ठसा विस्तारत असताना कंपनी महाराष्ट्रभरातील लाखो लोकांचे जीवन बदलवून टाकणाऱ्या नाविन्यपूर्णता, सर्वसमावेशकता आणि समाजकेंद्री आरोग्य सेवा उपायसुविधा वितरीत करण्यास वचनबद्ध आहे.