१. सोनी सबवरील मालिका ‘हिरो: गायब मोड ऑन’मध्ये वीर ऊर्फ हिरोची भूमिका साकारणारा अभिषेक निगम
माझ्या मते, व्हॅलेंटाइन्स डे हा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करण्याचा दिवस आहे, मग ते प्रियजन कुटुंब, मित्र असो किंवा कोणीही खास व मनाच्या जवळ असलेली व्यक्ती असो. मी कॉलेजमध्ये असताना माझी व्हॅलेंटाइन असण्याची इच्छा असलेल्या मुलीसाठी माझ्या पॉकेट मनीमधून चॉकलेट्स खरेदी करायचो. पण, आता सर्वकाही बदलले आहे आणि यंदा माझे एकमेव प्रेम माझी मालिका ‘हिरो: गायब मोड ऑन’ आहे. मी माझ्या या प्रेमाला जल्लोषात साजरे करणार आहे. मी वीरच्या नजरेतून व्हॅलेंटाइन्स डे पाहिला तरी मला खात्री आहे की, तो झाराला शहरातील गजबजलेल्या आवाजामधून दूर एका शांतमय ठिकाणी घेऊन जाईल आणि तिच्यासोबत उत्तम वेळ व्यतित करेल, सूर्यास्त व शहरातील दिव्यांचा पूर्णपणे आनंद घेईल.
मला माझ्या चाहत्यांना एकच संदेश द्यायचा आहे की, फेब्रुवारी प्रेमाचा महिना मानला जात असला तरी माझी त्यांच्याकडून सदैव प्रेम व पाठिंबा मिळण्याची इच्छा आहे.
२. सोनी सबवरील मालिका ‘बालवीर रिटर्न्स’मध्ये अनन्याची भूमिका साकारणारी अनाहिता भूषण
व्हॅलेंटाइन्स डे माझ्यासाठी वर्षातील इतर दिवसांप्रमाणेच आहे. माझ्या मते, आपल्या प्रियजनांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा ते साजरे करण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज नाही. मला आठवते की, माझ्या कॉलेज दिवसांमध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये गुलाब व भेटवस्तू असायचे आणि त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता व आनंद असायचा. मला या दिवसाच्या कॉलेजमधील उत्साहाची निश्चितच आठवण येईल.
मी यंदा व्हॅलेंटाइन्स डे साजरा करण्यासाठी कोणत्याही योजना आखलेल्या नाहीत. पण माझ्यासाठी कधीही कोणीही खास असेल, तेव्हा मी निश्चितच वर्षातील तो क्षण साजरा करेन. मी या दिवशी शूटिंगला असणार आहे आणि माझ्या स्वत:च्याच सोबतीचा आनंद घेणार आहे.
मी व्हॅलेंटाइन्स डे साजरा करण्यासाठी उत्सुक नसले तरी माझी भूमिका अनन्याला प्रेमाचा दिवस साजरा करायला आवडेल. माझ्या मते, ती गुलाब, फुगे, केक आणि व्हॅलेंटाइन्स सजावटीसह हा दिवस साजरा करेल.
यंदा माझा व्हॅलेंटाइन नसल्यामुळे मी या दिवशी माझ्या चाहत्यांप्रती असलेल्या प्रेमाची कबूली देऊ इच्छिते. ते सर्व माझे व्हॅलेंटाइन असणार आहेत. माझ्यावर प्रेम व पाठिंब्याचा वर्षाव करण्यासाठी मी प्रत्येक चाहत्याचे आभार मानते.
