मुंबई,12 फेब्रुवारी 2021: जेएसडब्ल्यू सिमेंट या भारतातील आघाडीच्या ग्रीन सिमेंट उत्पादक आणि 12 अब्ज डॉलर्सच्या जेएसडब्ल्यू ग्रूपचा भाग असलेल्या कंपनीने आपल्या सेल्स अॅण्ड मार्केटिंग कामकाजात डिजिटायझेशन अमलात आणून एआय समर्थित डिजिटल इंटरव्हेंशनच्या माध्यमातून आपल्या माध्यम भागीदारांना ईझ ऑफ डुइंग बिझनेसची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी त्यांनी यलोचॅट या जगातील आघाडीच्या कन्व्हर्सेशनल कॉमर्स (संवादी व्यवसाय) सेवा प्रदाता कंपनीशी भागीदारी केली आहे. यातून त्यांच्या व्यावसायिक ग्राहकांना एआय-आधारित एनीटाईम एनीवेअर बिझनेस व्यवहार करता येणार आहेत. यलोचॅट पार्टनरशीपमुळे जेएसडब्ल्यू सिमेंटला वॉट्सअॅपसारख्या मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देता येतील, व्यवहार करता येतील आणि विक्री करता येईल. यामुळे आर्थिक वर्ष 2023 पर्यंत जेएसडब्ल्यू सिमेंटला सध्याच्या 14 एमटीपीए वरून 25 एमटीपीए पर्यंतचा पल्ला गाठता येणार आहे.
जेएसडब्ल्यू सिमेंट ही आपल्या ग्राहकांना संवादी व्यवसाय सेवा देणाऱ्या काही पहिल्या भारतीय सिमेंट कंपन्यांमधील एक आहे. कन्व्हर्सेशनल कॉमर्स म्हणजे संवादाची विविध माध्यमांतून स्पीच रेकग्निशन, स्पीकर रेकग्निशन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरून केले जाणारे ई-कॉमर्स. संशोधनातून आढळून आले आहे की सध्या ब्रँड् आणि ग्राहकांमध्ये वैयक्तिक संवादाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या विश्वासाच्या आणि वैयक्तिक संबंधांमुळे ग्राहकांनाही अधिक चांगल्या सेवा मिळतात तसेच कंपन्यांना नवनवीन व्यावसायिक संधी उपब्लध होतात. त्यामुळे, कन्व्हर्सेशनल कॉमर्स म्हणजे ग्राहक सेवेला चालना देण्यात तसेच डिजिटल विक्री वाढवण्यातील एक मोठी संधी ठरत आहे.
जेएसडब्ल्यू सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पार्थ जिंदाल यांच्या मते, “डिजिटल तंत्रज्ञान जेएसडब्ल्यू ग्रूपच्या सर्व व्यवसायांच्या दीर्घकालीत शाश्वत प्रगती धोरणांना आकार देत आहे. भारतीय ग्राहकांना एकात्मिक गृहबांधणी पर्यार पुरवण्यात आम्ही अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहोत. आमच्या डिजिटल बदलांमुळे योग्य वेळेत डिलिव्हरी आणि सुनियोजित कार्यपद्धतींना एकूण ब्रँड अनुभवात सातत्याने होणाऱ्या सुधारणांची जोड देत आमच्या सर्व ग्राहकांना ईझ ऑफ डुइंग बिझनेसचा अनुभव मिळेल. सिमेंट उद्योगात 25 MTPA ची क्षमता गाठण्याच्या उद्देशाने वाटचाल करत असताना ग्राहकांच्या सतत उत्क्रांत होणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती आणि ते उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान आणि संशोधनात गुंतवणूक होत राहील याची खातरजमा करणार आहोत. या प्रवासात यलोचॅटचे भागीदार म्हणून स्वागत करताना मला आनंद होत आहे.”
यलोचॅटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जविअर माटा यांच्या मते, “तुम्ही जे काही करता त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी ग्राहकांना ठेवणे हे वाटते तितके सोपे नाही. मात्र, जेएसडब्ल्यू सिमेंट म्हणजे ग्राहककेंद्राभिमुखतेचे प्रतिक आहे. त्यांनी डीलर्ससोबतचे संबंध डिजिटाईज्ड केले आहेतच. पण त्याचसोबत त्यांना जे काही आवश्यक आहे ते सर्व व्हॉट्सअपच्या मदतीने देऊ करत मोठा बदल आणण्यासाठीही यलोचा वापर करण्यात आला. आता जेएसडब्ल्यू सिमेंटची सेल्स टीम डीलर्ससोबत अधिक अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यास सज्ज आहे.
भारताच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागात जेएसडब्ल्यू सिमेंटचे दमदार अस्तित्व आहे. या डिजिटायझेशन मोहिमेचा भाग म्हणून जेएसडब्ल्यू सिमेंट एआय आधारित मोबाइलटेक इंटरव्हेंशन सादर करत आहे. यात सर्व बाजारपेठांमधील त्यांच्या ट्रेड चॅनल्ससाठी कन्व्हर्सेशनल कॉमर्स सेवांचा समावेश असणार आहे. या डिजिटायझेशनसोबतच आपल्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या टीमच्या साह्याने व्यवसायात अधिक कार्यक्षमता आणि बाजारपेठेत अधिक चांगली ग्राहकसेवा दिली जाईल.
जेएसडब्ल्यू सिमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश नार्वेकर म्हणाले, “आमच्या फ्रंटलाईन सेल्स टीमच्या सर्व कार्यपद्धतींमध्ये आम्ही डिजिटल इंटरव्हेंशनचा अवलंब केला आहे आणि पुढील सर्व माध्यमांमध्ये ही प्रणाली वापरात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. आमच्या सेल्स अॅण्ड मार्केटिंग कामातील या डिजिटल बदलांमुळे अधिक कार्यक्षमता आणि परिणामकारकता साधत आघाडीवर उत्तम परिणाम साधण्यात आम्हाला साह्य होणार आहे. पुरवठा साखळीत मोबाइल-टेकचा वापर केल्याने आमच्या सेल्स टीमला सर्व माहिती अगदी बोटांच्या स्पर्शावर उपलब्ध होईल. यामुळे माध्यमांची कामगिरी जोखता येईल, ”
जेएसडब्ल्यू सिमेंटने मोबाइलटेक इंटरव्हेंशनच्या माध्यमातून आऊटबाऊंड मार्केटिंग कामांमध्ये डिजिटायझेशन आणले आहे. आपल्या माध्यम भागीदारांशी सहजसोप्या पद्धतीने संवाद साधणे तसेच ऑर्डर मिळवण्यासाठी हे तंत्रज्ञान कंपनीच्या सेल्स टीमला साह्य करत आहे. त्यांनी एआय समर्थित मोबाइलटेक टूल सादर केले आहे. कंपनीसोबत व्यवसाय करताना तो सहज पद्धतीने करण्याचा अनुभव माध्यम भागीदारांना मिळावा या हेतून या टूलची रचना करण्यात आली आहे. यात पुढील बाबींचा समावेश आहे :ऑर्डर देणे आणि डीलरसोबत व्यवहारांशी संबंधित संवाद यासाठी व्हॉट्सअॅपवर आधारित डीलर असिस्टंस इंटरव्हेंशनपाठवलेल्या ऑर्डर्सच्या ट्रॅक आणि ट्रेसिंगसाठी मोबाइल इंटरव्हेंशनपरिणामकारक मागणी व्यवस्थापन, किमतींचे योग्य व्यवस्थापन आणि एआय आधारित मागणीचा अंदाज घेऊन अधिक चांगल्या प्रकारे लीड तयार करण्यासाठी डिजिटाईज्ड सेल्स प्लॅनिंग
