कोल्हापूर, १९ फेब्रुवारी २०२१ः आरबीआय मान्यताप्राप्त स्व-नियमित संस्था आणि आरबीआय-नियमित मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्सची संघटना असलेल्या एमएफआयएन ने कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्राबरोबरच, एमएफआयएनचा सध्या अस्तित्वात असलेला टोल फ्रि क्रमांक १८०० १०२ १०८० ही सेवा सुद्धा सुरू आहे.
अचला सव्यसाची, नॅशनल हेड-स्टेट इनिशिएटीव्हि्स म्हणाल्या, कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या हिताच्या संरक्षणासाठी एमएफआयएन एसआरओ यांची पूर्वीपासूनच सक्षम अशी ग्राहक तक्रार निवारण प्रक्रिया अस्तित्वात आहे व त्याद्वारे विविध भाषांमधून नियोजनबद्ध पद्धतीने ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निवारण केले जाते. कोल्हापूर जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षाद्वारे महाराष्ट्रातील एनबीएफसी-एमएफआय ग्राहकांसाठी त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आणि तेही स्थानिक पातळीवर आणि वेळेत होण्यासाठी आणखी एक व्यासपीठ आता उपलब्ध झाले आहे. कोल्हापूर जिल्हा तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक +९१ ७०४२००३३१५ आता एमएफआयएन चे सदस्य आणि एनबीएफसी-एमएफआयच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. एमएफआयच्या ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी जिल्हा तक्रार निवारण केंद्रामध्ये नोंदवाव्यात असे आवाहन आणि सल्ला आम्ही ग्राहकांना दिला आहे.”
समाजातील दुर्लक्षित आणि अल्प-उत्पन्न स्तरातील लोकांसाठी मायक्रो-फायनान्स संस्था काम करतात. आर्थिक सर्वसमावेशकतेचे वाहक म्हणून या संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळेच त्या आरबीआय, केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांच्या प्राधान्याक्रमावर आहेत.
