गोदरेज समुहाची प्रमुख कंपनी, ‘गोदरेज अँड बॉइस’ आपल्या स्थापनेपासूनच भारताला स्वावलंबी बनविण्यात हातभार लावत आहे. ‘गोदरेज अप्लायन्सेस’ या आपल्या बिझिनेस युनिटच्या माध्यमातून, देशातील आरोग्यसेवा क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, गोदरेज अँड बॉइस ही कंपनी सध्या देशात सुरू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होत आहे. अतिशय संवेदनशील अशा लसी अगदी योग्य तपमानात सुरक्षितपणे साठविल्या जाव्यात, याकरीता प्रगत, देशातच बनविलेली ‘मेडिकल रेफ्रिजरेशन सोल्यूशन्स’ या कंपनीकडून पुरविली जात आहेत. आज या कंपनीने अत्याधुनिक, अल्ट्रा-लो (अतिशय कमी) तपमानाचे फ्रीझर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले आणि लसीची शीतसाखळी आणखी मजबूत केली. या प्रगत वैद्यकीय फ्रीझरमध्ये जीवरक्षक औषधे आणि अति महत्त्वाच्या लसी उणे 80 अंश सेल्सियस या तपमानात ठेवता येतात. भारतीय आणि जागतिक अशा दोन्ही वैद्यकीय शीतसाखळीला चालना देण्याच्या उद्देशाने हे फ्रीझर बनविण्यात आले आहेत.
अखेरच्या टप्प्यापर्यंत लस नेण्याच्या पुढील प्रवासात मदत होऊ शकेल, अशा इतर मार्गांचा गोदरेज अप्लायन्सेस शोध घेत आहे. ग्रामीण महाराष्ट्रात लसीच्या रेफ्रिजरेटरने सज्ज असलेली रुग्णवाहिका चालविण्याची चाचणी तीन दिवस वीजप्रवाह न जोडता घेण्यात आली. हा मोबाइल क्लिनिकचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या रेफ्रिजरेटरमधील तपमान दर दोन तासांनी तपासले जात होते आणि ते आवश्यक त्या टप्प्यामध्ये असल्याची खातरजमा करण्यात येत होती. भारतात लसीकरणाची गती वाढत असताना, अधिक चपळ अशी दूरस्थ प्रकारची उपाययोजना ही यशाची गुरुकिल्ली ठरू शकते.
देशाची सेवा करण्यासाठी ‘गोदरेज अॅंड बॉइस’ कंपनी नेहमीच कटिबद्ध असते. ‘मेडिकल कॉम्पोनंट्स’, ‘हॉस्पिटल बेड अॅक्च्युएटर्स’, ‘व्हेंटिलेटर्स’साठीचे ‘इलेक्ट्रो-मॅग्नेटिक व्हॉल्व्ह’ यांसारखी उपकरणे असोत; लोकांना घरात सुरक्षितपणे राहता यावे यासाठी ‘डिसइन्फेक्टंट’ उपकरणे बनविणे असो; किंवा लोकांना सुरक्षितपणे काम करता येण्यासाठी सामाजिक अंतर राखता येण्याजोगी कार्यालये उभी करणे असो; ‘गोदरेज’ने नेहमीच देशाचा विचार प्राधान्याने केला आहे. ‘मेड इन इंडिया’ मेडिकल रेफ्रिजरेटर्स, फ्रीझर्स व आता अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर्स बनवून, देशालाच नव्हे तर जगाला सर्वात जास्त गरज असलेल्या वेळी, सेवा करता येत असल्याचा कंपनीला अभिमान आहे.
