कोल्हापूर ता.21 :- शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये दिड टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा 95 वा रविवार असून या अभियानामध्ये स्वच्छता दूत अमित देशपांडे, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, महापालिकेचे अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टंस ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. हि मोहिम महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदरची स्वच्छता मोहिम दसरा चौक ते सीपीआर चौक परिसर, पंचगंगा नदी परिसर, शेंडापार्क ते सायबर चौक, एनसीसी ऑफिस ते गजानन महाराजनगर रोड, रंकाळा टॉवर ते तांबट कमान मेनरोड, कळंबा फिल्टर हाऊस ते शासकीय मध्यवर्ती कारागृह, शिये नाका मेनरोड, कावळा नाका ते शिरोली नाका येथे करण्यात आली.
स्वरा फौंडेशनच्यावतीने रंकाळा येथील डी मार्ट शेजारी असणाऱ्या फुटपाथ लगत लाल माती टाकून येथे वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर, फैजान देसाई, साक्षी गुंडकल्ली, सन्मेश कांबळे, आकाश कांबळे व सदस्य उपस्थित होते.
या स्वच्छता अभियानामध्ये वृक्षप्रेमी संस्थेमार्फत सानेगुरुजी वसाहत, हरिओम नगर, टाकाळा, माळी कॉलनी, राजाराम उद्यान, रमणमळा, राजारामपुरी जनता बाजार चौक, शाहू रोड, पंचगंगा नदी परिसर, दौलत नगर, व्हिनस कॉर्नर येथे 4 टीम विभागून झाडांचा मेंटेनन्स, आळी करणे, तण काढणे, पाणी घालने, प्लास्टिक कचरा उठाव तसेच झाडां भोवतीचे अनावश्यक लोखंडी ट्री गार्ड शिफ्टिंग करण्याचे काम या संस्थेमार्फत करण्यात आले. यावेळी वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, विशाल पाटील, सतीश कोरडे, प्रवीण मगदूम, गोवावाला, सचिन पोवार, शैलेश टिकार, भालचंद्र गोखले या सदस्यांनी सहभाग घेतला.
आजच्या स्वच्छता मोहिमेत 4 जेसीबी, 5 डंपर, 6 आरसी गाडया, 1 ट्रॅक्टर ट्रॉली, 2 औषध फवारणी, 1 पाणी टँकरचा वापर करण्यात आला. तसेच सदरची मोहिम महापालिकेच्या 120 स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने राबविण्यात आली.
यावेळी विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, दिलीप पाटणकर, अरविंद कांबळे, नंदकुमार पाटील, करण लाटवडे, महेश भोसले, श्रीराज होळकर, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.
