गेल्या वर्षभरापासून covid-19 मुळे तसेच आताच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्याची गाडी पुढे नेत आहेत त्यातच आता नवीन जीवनावश्यक वस्तूमध्ये दरवाढ आणि करवाढ करून सामान्य लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे काही सामान्य नागरीक काटकसरीने जगत आहेत पण या कडे सर्व लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लेक्ष होत आहे अनेक समस्याना तोंड देताना सामान्य लोकांचे नाकेनऊ होत आहे आणि त्यातही दरवाढ मग सामान्य नागरीक कसे जगतील हा ही मोठा प्रश्न उद्भवत आहे त्यात सरकारने नवीन कायदे आणत आहेत गॅसला सबसिडी व रेशनवर मिळणारे धान्य सुद्धा बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे मग सामान्य गरीब लोकांनी कसे जगायचे..? त्यात पेट्रोल डिझेलचे वाढते दर सगळी कडे होणारा भ्रष्टाचार व भेसळीचे प्रकार यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे त्यात कोणत्याही गोष्टीचे नियोजन आयोजन न करता सरकार मोगल शाही पद्धतीने व सूडबुद्धीने वागत आहे त्यात सर्व मंत्री आमदार खासदार यांच्या होणारा कोट्यावधी पेन्शनचा खर्च यामुळे आपल्या देशाची राज्याची आर्थिक घडी बिघडत चालली आहे जे काम सुद्धा करत नाही त्यांना लाखो पगार मग सरकारी अधिकारी नेमके काय काम करतात हा ही मोठा प्रश्न आहे covid-19 मुळे सर्वसामान्य जनतेने वीज बील भरले नाही त्यात राज्य सरकारने वीज बील माफ करण्याचे महाराष्ट्र जनतेला आश्वासन दिले मात्र ते ही आश्वासन फक्त एक फुग्याची हवाच होती त्यामुळे सत्तेवर असणाऱ्या सरकारने काढता पाय घ्यावा त्या सरकार लोक जनतेच्या भावना समजत नाहीत का..? प्रत्येकवेळी सरकार अपयशी ठरले आहे म्हणून उज्वल कोल्हापूर संघटना सरकारचा जाहीर निषेध करत आहे
सामान्य जनतेवर चे महागाई संकट दूर करा अन्यथा सरकारने पायउतार व्हावे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सो यांना देण्यात आले यावेळी उज्वल कोल्हापूर संघटनेचे गणेश लाड अजित पाटील किरण गायकवाड नितेश कुलकर्णी अभिजीत कदम राजाराम नरके आदी उपस्थित होते
