भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा सौ उमा खापरे यांच्या उपस्थितीत भाजपा महिला मोर्चाची आज भाजपा कार्यालयात बैठक घेण्यात आली. ह्या वेळेस महानगरपालिका निवडणूक संघटनात्मक रचने बाबत उमा खापरे यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक वॉर्ड मध्ये भाजपा महिला वॉर्ड अध्यक्ष व महिला बूथ प्रमुख नेमून महिलांचे संघटन वाढवावे असे आवाहन केले.केंद्रातील मोदी सरकारने महिला सबलीकरणासाठी चांगल्या योजना आणल्या आहेत,त्या योजना समाजातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहचवणे आपली जबाबदारी आहे. तसेच आगामी महापालिका निवडणूकीत भाजपा महिला नगरसेविकांची संख्या नक्कीच वाढेल अशी खात्री व्यक्त केली. आगामी महानगरपालिका निवडणूक संदर्भात प.मा देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.
महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत यांनी भाजपा च्या सात महिला मंडल अध्यक्षांची निवडीचे पत्र देऊन घोषणा केली. सौ सुरभी घाटगे यांची शिवाजी पेठ मंडल अध्यक्षा,सौ वंदना नायकवडी यांची उत्तरेश्वर पेठ मंडल अध्यक्षा, सौ निकिता यादव यांची राजारामपुरी मंडल अध्यक्षा, सौ अश्विनी साळोखे यांची लक्ष्मीपुरी मंडल अध्यक्षा पदी निवड करण्यात आली.
ह्या वेळी कोल्हापूर महिला आघाडी प्रभारी सौ सुवर्णा पाटील,सौ किशोरी स्वामी, प्रमोदिनी हर्डीकर, आसावरी जुगदार,सुष्मा गर्दे, मंगल निप्पणीकर, स्वाती कदम,गौरी जाधव,सौ शुभांगी चितारे,सौ श्वेता कुलकर्णी यांच्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
