कोल्हापूर/प्रतिनीधी : जगदंबा तलवार भारतात परत आणावी या मागणीसाठी शिवभक्त आक्रमक झाले आहेत.जगदंबा तलवार भारतात आणावी या मागणीसाठी कोल्हापूरचे शिवभक्त आज क्रिकेट मैदानातच घुसले. त्यांनी १३ रोजी कोल्हापूर तावडे हॉटेल येथे रास्ता रोको आंदोनल केले होते आणि आता कोल्हापुरच्या हर्षल सुर्वे यांसह तीन जणांनी आज १५ रोजी थेट पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भगवा ध्वज भडकवत आंदोलन केले. पुण्यातील याच मैदानावर भारत आणि इंग्लंडमध्ये क्रिकेट सामना होणार आहे. म्हणूनच इंग्लंडच्या राणीपर्यंत जगदंबा तलवारीचा विषय पोहोचवण्यासाठी हे आंदोलन केले असून याप्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हर्षल सुर्वे याचे सहकारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ग्राऊंड मधे घुसले याच मैदानात होणार होती इंडिया इंग्लंड क्रिकेट सामना याच मैदानावर फडकवला शिवरायांचा भगवा, तलवारीची केली आहे मागणी यावेळी ग्राउंड उकरताना
विजय दरवान, प्रदीप हांडे, हर्षल सुर्वे, चैतन्य अष्टेकर, देवेंद्र सावंत याना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडच्या संघाला महाराष्ट्रात सामना खेळू देणार नसल्याचाही इशारा आंदोलकांनी दिला आहे.छत्रपती शिवरायांच्या अनेक तलवारींपैकी एक प्रमुख तलवार करवीर छत्रपती घराण्याकडे होती. त्याचे जगदंबा तलवार, असे नाव होते. सध्या इंग्लंडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहात असणाऱ्या ‘रॉयल कलेक्शन ट्रस्ट’या ठिकाणी सेंट जेम्स पॅलेस येथे ही तलवार ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज चौथे हे अकरा वर्षांचे असताना इंग्लंडचा तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवा एडवर्ड) हा भारत भेटीवर आला होता. सन १८७५-७६ मध्ये त्यांना ही जगदंबा तलवार भेट म्हणून दिली होती. हीच इंग्लंड येथे असणारी जगदंबा तलवार भारतात परत यावी, अशी शिवभक्तांची भावना आहे. त्यासाठीच आता शिवभक्त आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्या माध्यमातून कोल्हापुरात रास्तारोको करत आंदोलन करण्यात आले होते. आता हाच विषय इंग्लंडच्या राणीपर्यंत पोहोचावा म्हणून ज्या ठिकाणी इंग्लंड आणि भारत दोघांमध्ये क्रिकेट सामना होणार आहे, त्या मैदानावरच भगवा ध्वज फडकवत आंदोलन करण्यात आले आहे. शिवाय येत्या २३ मार्चला होणाऱ्या क्रिकेट सामन्यातही इंग्लंडच्या टीमला विरोध करणार असल्याचा इशारा शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्या वतीने देण्यात आला आहे.