कोल्हापूर प्रतिनिधी : येथील भारतीय जनता पार्टी चे कोल्हापूर दक्षिण तालुका अध्यक्ष श्री. महेश मोरे यांनी कोरोना लसीकरण केंद्र कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये सुरू करणेबाबत जिल्हाधिकारी ना निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की, दक्षिण विधानसभा मतदार संघातील बहुतांश सर्वच गावे मोठ्या लोकसंख्येची असल्या कारणाने कोरोनाच्या या गंभीर परिस्थिती मध्ये गावपातळीवर लसीकरण होणे गरजेचे आहे . जेणेकरुन गर्दी टाळता येईल.
दक्षिण मतदार संघांमध्ये असणाऱ्या 36 गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय किंवा सार्वजनिक हॉल अशा ठिकाणी हे लसीकरण केंद्र सुरू करून सोशल डिस्टन्स पाळता येईल. गावपातळीवर लसीकरण करत असताना गरज भासल्यास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते मदत करण्यास तयार असतील असे देखील या निवेदनात नमूद केले आहे.
यावेळीकरवीर तालूका अध्यक्ष महेश मोरे सोशल माडिया जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज जाधव व विकि मोरे बुद्धराज जाधव उपस्थित होते.