आज दि १४ : कोरोनाच्या संकट काळामध्ये गेल्या दीड वर्षापासून रोजगाराचे संकट सर्वसामान्य जनतेवर असून सर्वांना सतावत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अशा अनेक घटकांना या संकट काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सेवा कार्याच्या माध्यमातून मदत पुरवली जात आहे.
आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर शहरातील रिक्षा व्यावसायिकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने वितरित करण्यात आले. राजारामपुरी ११ वी गल्ली येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये रिक्षा व्यवसायिकांना उदरनिर्वाहासाठी सहकार्य करून भारतीय जनता पार्टी रिक्षा व्यवसायिकांना एक आधार द्यायचा प्रयत्न करत आहे.
यावेळी कॉमन मॅन व युवक मित्र मंडळ तर्फे चालणाऱ्या जनसेवा केंद्रास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली व केंद्राच्या उपक्रमाची माहिती घेतली.
याप्रसंगी भाजपा प्र.का.सदस्य महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर, अॅड.वंदुरे-पाटील, भाजपा रिक्षा आघाडी संयोजक नरेंद्र पाटील, अविनाश दिंडे, सुनीलसिंह चव्हाण, अभिजीत शिंदे, दिलीप बोंद्रे, तानाजी निकम, सचिन साळोखे आदी कार्यकर्ते व रिक्षा व्यवसायिक उपस्थित होते.