मुंबई ,:हंगामा प्ले, या हंगामा डिजीटल मीडिया मालकीच्या अग्रगण्य ओटीटी मंचावर शुभ मंगल में दंगल हा नवीन कार्यक्रम लॉन्च करण्यात आला. या कार्यक्रमात अदा खान आणि निशांत मलकानी सारखे लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या काळात नातेवाईक मर्यादीत पाहुणे निर्बंधाकडे दुर्लक्ष करतात आणि एकच धमाल उडते अशा संकल्पनेवर हा शो आधारीत आहे. सिक्स्थ सेन्स एंटरटेनमेंट्सची निर्मिती असलेली ही सिटकॉम रजत व्यास यांनी लिहिली असून संजीव चढ्ढा यांनी दिग्दर्शन केले आहे. या कार्यक्रमात अमित बहल, मानिनी डे, अमिता नांगिया, नॅन्सी गिल, तपस्या अग्निहोत्री, संगीता ओडवानी, नीरज सूद, समृद्धी चढ्ढा, ईश्तीयाक खान, मिथिलेश चतुर्वेदी, संदेश नायक आणि मेलिसा पैस असे लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
शुभ मंगल में दंगल चे कथानक विश्वनाथ (निशांत मलकानी) आणि मिताली (अदा खान) यांच्या आयुष्याभोवती फिरणार असून या जोडप्याच्या नात्यात भोपाळमध्ये जंगी भारतीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. शहरात सोशल डिस्टन्सिंगचे निर्बंध असतात, त्यामुळे मर्यादीत ५० पाहुण्यांना आमंत्रण देण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुखांच्या खांद्यावर असते. या विवाहात सर्वांना सामावून घेण्यासाठी नातेवाईक आग्रही असतात. ज्यामुळे १०० पेक्षा अधिक वराती जमा होतात आणि एकच अनपेक्षित धमाल उडते. विश्वनाथच्या कुटुंबात गोंधळाचे वातावरण निर्माण होते. ही मर्यादेपेक्षा जास्त झालेली पाहुणेमंडळी लपवणे, वरातीत दूरच्या नात्यातील प्रत्येक नातेवाईकाचा देहाभिमान जपण्याची धांदल उडते. त्यामुळे विवाह सोहळ्यात कल्लोळाची स्थिती उदभवते. ज्यामुळे लग्नाची गंमत आणखी वाढते. विवाह विधीनंतरचा समारंभ नीट साजरा व्हावा याकडे दोन्ही कुटुंबांचा कटाक्ष असतो.
या कार्यक्रमाविषयी बोलताना हंगामा डिजीटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले की, हंगामा मध्ये नेहमी अभिनव कथांचा समावेश करण्याकडे आमचा कल असतो. ज्यामुळे नव्या दमाच्या कथाकथनाची कक्षा विस्तारेल. त्यात भर म्हणून आमच्या लक्ष्यकेंद्री प्रेक्षकांच्या पसंतीच्या कथांचा समावेश आवश्यक ठरतो. विनोदी प्रकार कुटुंबाला एकत्र गुंतवून ठेवतो. त्यामुळे दृश्य अनुभव अधिक मनोरंजक होतो. शुभ मंगल में दंगल सह आम्हाला विश्वास वाटतो की, प्रेक्षकांना समर्पक तरीही हसवणूक होईल असे प्रसंग दाखवून योग्य तार छेडली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाट्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणारा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आणि कुटुंबांच्या पसंतीस उतरणार आहे.
आजपासून सुरू होणारा हा कार्यक्रम हंगामा प्ले, या हंगामाच्या व्हीडिओ ऑन डिमांड मंचावर उपलब्ध होईल. हा कार्यक्रम जगभरातील १५० लाखांहून अधिक प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी हंगामा आपल्या वेगवान वितरण जाळ्याला चालना देणार आहे. हंगामा प्लेद्वारे व्होडाफोन प्ले, आयडिया मुव्हिज अँड अॅम्प; टीव्ही, एअरटेल एक्स्ट्रीम अॅप, अमेझॉन फायर टीव्ही स्टीक, टाटा स्काय बिंज्, एमएक्स प्लेयर आणि अँड्रोईड टीव्हीवर उपलब्ध असेल. त्याशिवाय, हंगामाच्या शाओमीसोबत भागीदारीमुळे उपभोकत्यांना मी टीव्ही वरून हंगामा प्लेद्वारे शॉर्ट फिल्म पाहणे शक्य होणार आहे.
शुभ मंगल में दंगल ट्रेलर इथे पहा–
