कोल्हापूर दि.26 : लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय असून त्यांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी स्मृती शताब्दी पर्वात आज शालेय स्तरावर छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील घडलेल्या प्रसंगावर आधारित कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील 1 हजार 967 शाळामधील 1 लाख 14 हजार 491 विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांनी कथाकथनातून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले.
शालेय स्तरावरील कथाकथन स्पर्धेत आजरा तालुक्यातील 72 शाळेतील 6 हजार 924 विद्यार्थी, भूदरगड तालुक्यातील 81 शाळेतील 556 विद्यार्थी, चंदगड तालुक्यातील 143 शाळेतील 4 हजार 265 विद्यार्थी, गडहिंग्लज तालुक्यातील 103 शाळेतील 431 विद्यार्थी, गगनबावडा तालुक्यातील 22 शाळेतील 422 विद्यार्थी, हातकणंगले तालुक्यातील 362 शाळेतील 13 विद्यार्थी 254 विद्यार्थी, कागल तालुक्यातील 249 शाळेतील 44 हजार 367 विद्यार्थी, करवीर तालुक्यातील 306 शाळेतील 4 हजार 310 विद्यार्थी, पन्हाळा तालुक्यातील 113 शाळेतील 10 हजार 432 विद्यार्थी, राधानगरी तालुक्यातील 74 शाळेतील 709 विद्यार्थी, शाहुवाडी तालुक्यातील 112 शाळेतील 224 विद्यार्थी, शिरोळ तालुक्यातील 157 शाळेतील एक हजार 225 विद्यार्थी आणि कोल्हापूर महापालिकेच्या 173 शाळेतील 27 हजार 372 विद्यार्थ्यांनी कथाकथन स्पर्धेत उत्सफूर्तपणे सहभाग घेतला.
