कोल्हापूर ता.10 – भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियान राबविण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत महानगरपालिकेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत शुक्रवार दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत ‘मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन व चर्चा फेसबुक व सामाजिक माध्यमाद्वारे ऑनलाईन आयोजित करण्यात आले आहे. या विषयावर महानगरपालिका हे मार्गदर्शन महापालिका कर्मचारी व सर्व नागरीकांचेसाठी आयोजीत केले आहे. हे मार्गदर्शन सायबर इन्स्टिट्यूटचे असोसिएट प्रोफेसर डॉ. राजेंद्र जोशी करणार आहेत. यामध्ये ऑनलाईन फसवणूक, ब्लॅकमेलिंग, आर्थिक फसवणूक, मोबाईलचा अति वापराचे आरोग्यावर होणारे परिणाम, मुलांच्या अभ्यासावर होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी महानगरपालिकेचे फेसबुक पेज www.facebook.com/KolhapurCorporation वर भेट देऊन फेसबुक लाईव्हद्वारे सदर मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
