कोल्हापूर ता.10 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महापालिकेच्यावतीने शहरातील एैतिहासिक स्थळांची व कार्यालयांची स्वच्छता केली. हि स्वच्छता मोहिम सर्व खातेप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील कार्यालये, विभागीय कार्यालये, छत्रपती शिवाजी मार्केटमधील कार्यालये, आरोग्य विभागाची कार्यालये, सर्व फायर स्टेशन यांची कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. तसेच आरोग्य विभागामार्फत शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, एैतिहासिक पाण्याचा खजिना परीसर, केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान व राधाकृष्ण मंदिर परीसराची स्वच्छता करण्यात आली.
सदरची एैतिहासिक वास्तूंची स्वच्छता मोहिम विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर, मुकादम व महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचा-यांनी केली.
