कोल्हापूर ता.११: रक्षाबंधन बहिण भावाच्या नात्याची माहिती सांगणारा. या दिवशी बहिण भावाला राखी बांधत सुखी समृद्ध अशी प्रार्थना करते तर भावा बहिणीच्या कल्याणासाठी आज पाठीशी आहे याची ग्वाही देत असतो. सख्या नात्याची ही वीण अधिक घट्ट होत असताना दुसरीकडे रक्ताच्या नात्या पलीकडील बहिण भावाचे नातेबंध कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील व शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील भारती चिंचणे हे जपत आहेत. प्रति वर्षाप्रमाणे यंदाही गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील व अधिकाऱ्यांना श्रीमती चिंचणे यांनी राखी बांधत बहिण भावाचे नाते आणखी दृढ केले.
राजापूर, ता. शिरोळ येथील महिला भारती चिंचणे यांचे पती २००५ च्या महापुरात वाहून गेले. एवढेच नाही तर त्यांचे राहते घर व जनावरे देखील या पुरात वाहून गेलीत. त्यांचेवर कोसळलेला दु:खाचा डोंगर सावरण्यासाठी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी भारती चिंचणे यांना घर बांधण्यासाठी गोकुळ मार्फत आर्थिक सहाय्य करून त्यांच्या जीवनात जगण्याची उमेद निर्माण केली.याची जाण ठेवून भारती चिंचणे यांनी २००५ सालापासून आजतागायत म्हणजेच गेली १७ वर्षे गोकुळचे चेअरमन व त्यांच्या सहकारी संचालकांना राखी बांधून गोकुळचे व आपले ऋणानुबंध जपलेले आहेत.
यावेळी चेअरमन विश्वास पाटील,पशुसंवर्धन व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.यु.व्ही.मोगले, पशुसंवर्धन सहा.व्यवस्थापक डॉ.पी.जे साळुंके, सहा.व्यवस्थापक डॉ.प्रकाश दळवी, संकलन सहा.व्यवस्थापक दत्तात्रय वाघरे, सहा.व्यवस्थापक बी.आर. पाटील, मिल्काटेस्टर विभाग प्रमुख आनंदा स्वामी, वैरण विकास अधिकारी भरत मोळे,जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील,अधिकारी एम.पी.पाटील, रमेश पाटील,डॉ.मोरे उपस्थित होते.
