उदगीर: (डॉ. हंसराज वैद्य, नांदेड. विवेक सौताडेकर,लातूर. सतीश पाटील मानकीकर, उदगीर. उमाकांत मिटकर, मुंबई. विमल मुधाळे, लातूर. प्रा. अरविंद सगर, परभणी. या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.)*
आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा त्यांचे कौतुक करून त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने चला कवितेच्या बनात,उदगीर. या साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीच्या आणि झील कांता सोशल इंटरनॅशनल फाउंडेशन,या आंतरराष्ट्रीय संस्था पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
स्व. कांताबाई मारुती तलवाडकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ लेखिका व कवयित्री शांताबाई गिरबणे यांच्या अध्यक्षतेखाली या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ. हंसराज वैद्य व परभणी येथील सुप्रसिद्ध कवी व गजलकार प्रा.अरविंद सगर. बिपिन जयंतराव पाटील, प्रसिद्ध उद्योजक उदगीर, आणि राजेंद्र विमलाई श्रीमंत सगर संस्थापक अध्यक्ष काव्य मित्र संस्था पुणे आदींसह आयोजक संस्था असणाऱ्या ‘चला कवितेच्या बनात’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अनंत चंपाई माधव कदम व’झीलकांता इंटरनॅशनल सोशल फाउंडेशन ‘ च्या संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील जीएसटीकर निरीक्षक डॉ.प्रेमिलातलवाडकर, निवृत्त अधिकारी मारुती तलवाडकर आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी नांदेड येथील प्रसिद्ध समाज सेवक तथा साहित्यिक हंसराज वैद्य यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, लातूरचे साहित्यिक तथा इतिहास संशोधक विवेक सौताडेकर यांना त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल ‘राज्यस्तरीय शिक्षणसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. उदगीर येथील तरूण तडफदार सतीश पाटील मानकीकर यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल राज्यस्तरीय युवा रत्न पुरस्कार तर विमल मुदाळे, लातूर.यांच्या शब्दचकोर या साहित्यकृतीस अणि उमाकांत मिटकर,मुंबई. यांच्या डिवाइन जस्टीस या साहित्यकृतीस राज्यस्तरीय साहित्य साधना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
अत्यंत देखण्या सोहोळ्याचे प्रास्ताविक कवितेच्या बनातचे संयोजक अनंत चंपाई माधव कदम यांनी केले तर स्वर्गीय कांताबाईंचा परिचय झीलकांता इंटरनॅशनल सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्ष तथा जीएसटी निरीक्षक पुणे डॉ. प्रमिला तलवाडकर यांनी करून दिला. सुंदर सोहळ्याने भारावून गेलेल्या सत्कार मूर्तीनी भाऊक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सगर यांनी केले तर आभार अॅड.अमोल तलवाडकर यांनी मानले.
