कोल्हापूर, दि. 11 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गतच “स्वराज्य महोत्सव” निमीत्त, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील बंदयांकरीता प्रबोधनात्मक, सांस्कृतिक व समुपदेशनात्मक “जीवन गाणे गातच जावे…” हा कार्यक्रम संपन्न झाला.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन आज उपजिल्हाधिकारी विवेक काळे, सहा. आयुक्त जिल्हा रोजगार कौशल्य विकास अधिकारी संजय माळी, कारागृह अधीक्षक पांडूरंग भुसारे व वरिष्ठ तुरुंगाधिकारी सतिश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गतच “स्वराज्य महोत्सव” निमीत्त, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया मार्फत विविध सांस्कृतिक, देशभक्तीपर, थोर संत, ज्येष्ठ साहित्यीक व कवी, थोर महापुरुष यांच्या जीवनकार्यावर आधारीत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संपुर्ण राज्यभर करण्यात येत आहे.
कैदयांकरीता आयोजित या कार्यक्रमात, महाराष्ट्रच्या लोककलेसोबतच, कैदयांचे प्रबोधन, योगाचे महत्व, देशभक्ती भावना जागृत करणाऱ्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील कैदयांनाही सहभागी करुन त्यांचे कलागुण सादर केले.
