उत्तुर, : भादवणवाडी ता.आजरा येथील भाजपचे गटनेते महादेव दिवेकर यांचा कार्यकर्त्याच्या समवेत आमदार हसनसाहेब मुश्रीफ गटात प्रवेश केला. या प्रवेशाबद्दल आमदार श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार झाला. भाजप पक्षाचे धोरण हे समाजाला काहीही उपयोग नसल्यामुळेच तो गट सोडत असल्याच्या प्रतिक्रिया, यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये सुरेश सिमणे, बापूराव अनावरे, दीपक सिमणे, बबन अनावरे अशोक कुंभार दिनकर पाटील यांचा समावेश आहे.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही……..
यावेळी बोलताना आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत आलेल्या या कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवेन. माझ्यासह माझे कार्यकर्तेही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत. गेल्या ३० -३५ वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत गट -तट, पक्ष -पार्टी असा भेदाभेद न मानता काम करीत राहिलो. त्यामुळेच जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले. जनतेच्या आशीर्वादाची ही कवचकुंडले सदैव माझ्यासोबत असतील.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी उपसभापती शिरीष देसाई, विजयराव वांगणेकर, मारुतीराव घोरपडे, दीपक देसाई व भादवणवाडी येथील प्रमुख कार्यकर्ते कृष्णा परीट, बळवंत सिमणे, गणपती चौगुले, आनंदा चौगुले, भरत सिमणे, प्रकाश मगदूम, महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
