कोल्हापूर ता.10 : प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेअंतर्गत मंजूर प्रकरणे असलेल्या लाभार्थ्यांनी अद्याप बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र घेतलेली नाही अशा लाभार्थ्यांकरीता महापालिकेच्यावतीने दोन दिवसाच्या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसाच्या कॅम्पमध्ये 39 प्रकरणे मंजूर करण्यात आली. शुक्रवारी आयोजित कॅम्पमधे 22 लाभार्थ्यांनी उपस्थिती लावली. यामध्ये 12 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आले आहे. या कँम्पमध्ये 3 बांधकाम परवानगीचे प्रस्ताव मंजूर, 3 लाभार्थ्यांचे प्रारंभ प्रमाणपत्र व 6 भोगवटा प्रमाणपत्र जागेवर देण्यात आले आहे.
या कॅम्पला नागरीकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. हा कॅम्प प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेचे कार्यकारी अभियंता नारायण भोसले, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, सुनील भाईक, चेतन आरमाळ, अक्षय आटकर, मयुरी पटवेगार, गुंजण भांरबे-चव्हाण, अवधूत नर्लेकर, सामाजिक विकास विशेष तज्ञ युवराज जबडे, एमआयएस तज्ञ योगेश पाटील प्रधानमंत्री आवास योजनेचे कर्मचारी यांनी नागरीकांची कामे तपासून सादर केली. वास्तुशिल्पी यांचे या कॅम्पला सहकार्य लाभले व नियोजनबध्द कॅम्पचे कामकाज पार पडले.
