विरोधी पक्षनेते नामदार अजितदादा पवार यांचा कागल दौराही यशस्वी करा
साजरा होणार शिवजयंती रयत लोकोत्सव सोहळा
कागल, दि. १२ :कागलमध्ये शिवजयंती रयत लोकोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करूया. शिवजयंतीदिवशी कागलमध्ये भगवे वादळ येईल, असा विश्वास आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कागलमध्ये रविवार दि. १९ रोजी शिवजयंती व शुक्रवार दि. १७ रोजी विरोधी पक्षनेते नामदार अजितदादा पवार यांचा कागल दौरा या संदर्भात आयोजित नियोजनाच्या बैठकीत श्री. मुश्रीफ बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते.
नामदार अजितदादा पवार यांच्या शुक्रवारी दि. १७ होणाऱ्या कागल दौऱ्यामध्ये कागल शहरातील श्रमिक वसाहतीमधील राजमाता जिजाऊ माॅसाहेब या बगीचाचे लोकार्पण, बस स्टॅन्ड परिसरात कागलचे अधिपती श्रीमंत जयसिंगराव महाराज ( बाळ महाराज) पुतळा सुशोभीकरण, निपाणी वेस येथील श्री. राधाकृष्ण मंदिराचा विस्तारित सभामंडप या विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. सायंकाळी सहा वाजता गैबी चौकामध्ये शेतकरी, युवक व महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे.
रविवार दि. १९ रोजी शिवजयंती दिवशी निपाणी वेस येथे शिवज्योतीचे आगमन व स्वागत, मुख्य बाजारपेठेतून भव्य मिरवणुकीसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुतळ्याला जल- दुग्धाभिषेक, नगरपालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन, गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि इतिहास प्रसारासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांचा सत्कार. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकांच्या २५ हजार प्रतींचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप, सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत बस स्टॅन्डजवळच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात भव्य- दिव्य असा विद्युत रोषणाईचा स्टॅंडिंग लाईट लेसर शो असे कार्यक्रम होणार आहेत.
बैठकीला गोकूळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, केडीसीसी बॅंकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष विकास पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, माजी सभापती जयदीप पोवार, जिल्हाध्यक्षा शितलताई फराकटे, देवानंद पाटील, नारायण पाटील, सुनील माने, रणजीत बन्ने, मानसिंगराव पाटील, सौरभ पाटील, अरुण पाटील, नेताजीराव मोरे, डी.एम.चौगले, अस्लम मुजावर, बळवंत माने, संदीप भुरले, दत्तात्रय पाटील, कृष्णात मेटील, दत्तात्रय पाटील, अर्जून नाईक आदी प्रमुख उपस्थित होते.
“डोळ्याचं पारणं फिटेल……..”
श्री. मुश्रीफ म्हणाले, शुक्रवारी दि. १७ विरोधी पक्षनेते अजितदादा पवार कागल दौऱ्यावर येत आहेत. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून त्यांचा दौरा यशस्वी करा. रविवारी दि. १९ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवजयंती रयत लोकोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याला कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची “न भूतो न भविष्यती” अशी उपस्थिती लाभेल. त्यादिवशी कागल शहरात अक्षरशा भगवे वादळ येईल आणि डोळ्याचं पारणं फिटेल, असेही ते म्हणाले.
स्वागत प्रवीण काळबर यांनी केले. प्रास्ताविक विकास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले.
