कोल्हापूर: वाढत चाललेली महागाई, वाढते गॅस दर, आणि लोकांच्या खिशाला बसणारी महागाईच्या झळा , याच्या विरोधात आज कोल्हापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने महागाई मध्ये महिला दिन कसा करायचा असा सवाल शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने उपस्थित केला.
यावेळी स्मुर्ती इराणी तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत, उद्धव ठाकरे यांच्या जय जय कराच्या घोषणा महिला पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आल्या,आंदोलन स्थळी गॅस टाक्या ही आणल्या होत्या.यावेळी कोल्हापूर मधील छत्रपती शिवाजी चौक येथे निदर्शने करण्यात आली, मागण्यांचे जिल्हाधिकारी रेखावार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघाटीका स्मिता सावंत मांडरे , सविता कानूरकर, मंगल पोवार, स्वरूपा कुरदळे,सुरेखा गाडीवडर, जयश्री पाटील, नम्रता पाटील, अश्विनी देसाई, सानिका दामूगडे, अनिता ठोंबरे, वंदना शेळके,विद्या साळोखे, माधवी लोणारे,शोभा खेडकर
यांच्यासह महिला उपस्थित होत्या.