उदगीर प्रतिनिधी- स्त्री जीवन किती कठीण आणि किती हळव असतं. त्यातल्या त्यात ग्रामीण स्त्रियांच भावविश्व खूप वेगळं असतं. त्याचा शोध घेत असताना जिने जगण्याची प्रकाश वाट दाखवली अशी डॉक्टरी भाविश्वाला भावलेली ग्रामीण स्त्री म्हणजे मुक्तामय होय.असे मत प्रसिद्ध साहित्यिक तथा स्त्रीरोगतज्ञ डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी व्यक्त केले.
शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे प्रसिद्ध साहित्यिका प्रा.डॉ.ललिता गादगे यांच्या अध्यक्षतेखाली चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या महिला दिन विशेष 285 व्या वाचक संवादात स्वलिखित मुक्तामाय या साहित्यकृतीवर बोलताना डॉ. वृषाली किन्हाळकर म्हणाल्या की दुःख, निवेदने, उच्चार करत, नशिबाला बोल लावत, सातत्याने इतरांकडून सहानुभूती मानणार्या स्त्रियांपैकीच एक जिने आपलं दुःख हयात भर अनुच्चारीत ठेवून कुणाकडूनही कसलीच इच्छा-अपेक्षा न बाळगता निरपेक्ष कर्मयोग जपणारी स्त्री म्हणजे मुक्तामाय होय. मोहातून मुक्त झालेली मुक्तामाई आपण फक्त द्यायचं. देवाला देखील काही मागू नये म्हणणार्या मुक्तामाय बद्दल कवितेतून मांडलेले विचार… ‘तू नाही बोललीस कधीच स्वतःबद्दल, व्यक्तिगत अभावाबद्दल, आयुष्यातल्या रिकाम्या जागा बद्दल, मात्र जगणं म्हणजे काय ते लख्ख सांगून गेलीस’.
यावेळी झालेल्या चर्चेत अर्चना पैके, रामभाऊ जाधव, कुलकर्णी, सुमित्रा वट्टमवार, सुरेखा गुजलवार आदींसह अनेकांनी सहभाग नोंदवला. शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.ललिता गादगे म्हणाल्या की, सर्व सुख उपभोगलेल्या एका स्त्रीने एका सर्व त्यागी स्त्रीच्या स्त्रीत्वाचे केलेलं कौतुक कवितेच्या माध्यमातून मांडताना कवितेची पीळ आणि पोत, पुष्कळसा निराळा,खूपसा प्रेरक असला तरी अनेकदा अस्वस्थ करून टाकणार आहे.सर्व सुख उपभोगलेल्या एका स्त्रीने एका सर्व त्यागी स्त्रीच्या स्त्रीत्वाचे केलेलं कौतुक कवितेच्या माध्यमातून मांडताना कवितेची पीळ आणि पोत, पुष्कळसा निराळा,खूपसा प्रेरक असला तरी अनेकदा अस्वस्थ करून टाकणार आहे. या संपूर्ण कवितेतून जाणवणारा आवेग वाचकांना हलवून सोडतो. या दीर्घ कवितेमधून एकाच वेळी प्रखर वास्तवतेला अत्यंतिक संवेदनशीलतेने शब्दबद्ध केलेले असून मुक्तामाईच्या पदरात बांधलेले शोकतत्व हळुवारपणे फुलाच्या पाकळ्या उकलून दाखवाव्यात त्याप्रमाणेच या कवितेच्या माध्यमातून डॉक्टर किन्हाळकर यांनी स्त्री जीवनाचे भावविश्व उलगडून दाखवले आहे.
या कार्यक्रमाचे संचलन आनंद बिरादार यांनी केले तर प्रास्ताविक संयोजक अनंत कदम यांनी मांडले, पाहुण्यांचा परिचय प्रा. राजपाल पाटील यांनी व अध्यक्षांचा परिचय बालाजी सुवर्णकार यांनी करून दिला. शेवटी आभार राजेंद्र एकंबेकर यांनी मानले. यावेळी रसिक श्रोते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्त्रीच्या स्त्रीत्वाचे केलेलं कौतुक कवितेच्या माध्यमातून मांडताना कवितेची पीळ आणि पोत, पुष्कळसा निराळा,खूपसा प्रेरक असला तरी अनेकदा अस्वस्थ करून टाकणार आहे. या संपूर्ण कवितेतून जाणवणारा आवेग वाचकांना हलवून सोडतो. या दीर्घ कवितेमधून एकाच वेळी प्रखर वास्तवतेला अत्यंतिक संवेदनशीलतेने शब्दबद्ध केलेले असून मुक्तामाईच्या पदरात बांधलेले शोकतत्व हळुवारपणे फुलाच्या पाकळ्या उकलून दाखवाव्यात त्याप्रमाणेच या कवितेच्या माध्यमातून डॉक्टर किन्हाळकर यांनी स्त्री जीवनाचे भावविश्व उलगडून दाखवले आहे.
या कार्यक्रमाचे संचलन आनंद बिरादार यांनी केले तर प्रास्ताविक संयोजक अनंत कदम यांनी मांडले, पाहुण्यांचा परिचय प्रा. राजपाल पाटील यांनी व अध्यक्षांचा परिचय बालाजी सुवर्णकार यांनी करून दिला. शेवटी आभार राजेंद्र एकंबेकर यांनी मानले. यावेळी रसिक श्रोते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
