ऐतिहासिक गैबी चौकात नागरिकांना संविधानाचे वाटप व शपथ
कागल, दि. ३०:आज प्रभू श्री. रामनवमी दिवशी होत असलेल्या आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कागलचे ग्रामदैवत प्रभू श्री. राममंदीरात सर्व प्रमुख कार्यकर्ते यांचे हस्ते महाअआरती करण्यात आली. यावेळी कागल ग्रामस्थ व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाआरती मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. आमदार श्री. मुश्रीफसाहेबाना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे व त्याच्यावरील सर्व संकटांमधून मुक्ती व्हावी. अशा सद्भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
