महिमा,सिद्धी,विवान व व्यंकटेश आघाडीवर
कोल्हापूर:-कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने छत्रपतींचे शिवाजी महाराज स्टेडियम येथे जिल्हा संघटनेच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या सतरा वर्षाखालील मुला-मुलींच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज सुरू झाल्या.या स्पर्धा मुलांच्या गटात स्विस लीग पद्धतीने सहा फेऱ्यात होणार आहेत तर मुलींच्या गटात राऊंड रॉबिन पद्धतीने एकूण सात फेऱ्यात होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन रोटरी क्लब समाजसेवा विभागाचे समन्वयक प्रवीण कुंभोजकर व जिल्हा ग्राहक बार असोसिएशनचे सचिव अँड.राजेंद्र वायंगणकर यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लबचे समाजसेवा विभागाचे समन्वयक प्रवीण कुंभोजकर यांनी शालेय बुद्धिबळपटूसाठी निवड स्पर्धा व प्रशिक्षण व विशिष्ट युनिफॉर्म प्रदान करण्यासाठी रोटरी क्लब च्या वतीने सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,धीरज वैद्य,उत्कर्ष लोमटे,आरती मोदी महेश व्यापारी इत्यादी उपस्थित होते राजेंद्र मकोटे यांनी कार्यक्रमाची सूत्रसंचालन केले.
आज झालेल्या चौथ्या फेरीनंतर मुलांचे गटात अग्रमानांकित इचलकरंजीचा विवान सोनी व कोल्हापूरचा व्यंकटेश खाडे पाटील हे दोघेजण चार गुणांचा संयुक्तपणे आघाडीवर आहे.शंतनू पाटील कोल्हापूर,अभय भोसले जांभळी,रियार्थ पोद्दार इचलकरंजी,आरव पाटील कोल्हापूर हरीण कुलकर्णी कोल्हापूर,प्रथमेश व्यापारी पाचगाव व सार्थक घोरपडे कोल्हापूर हे सात जण तीन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत तर मुलींच्या गटात अग्रमानांकित कोल्हापूरची महिमा शिर्के चार गुणासह आघाडीवर आहे तर नांदणी ची सिद्धि बुबणे व संस्कृती सुतार या दोघी तीन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.
