आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री. श्री. रविशंकरजी दि.५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान पुणे दौऱ्यावर आहेत. मरकळ आश्रम, मरकळ येथे त्यांच्या सानिध्यात विविध कार्यक्रम होत आहेत.
सोमवार दि. ५ फ़ेब्रु. रोजी सायंकाळी रुद्रपुजा आणि महासत्संग होत आहे.मंगळवार दि. ६ फेब्रु. रोजी गुरुदेवांचे “ज्ञानगंगा” हे ज्ञानसत्र होईल. यामध्ये ते उपस्थितांसोबत ज्ञान चर्चा करतील.
बुधवार दि. ७ फेब्रु. रोजी कार्पोरेट, औद्यागिक आणि व्यावसाईक जगतातील प्रतिनिधींना व्यावसाईक क्षेत्रातील नितीतत्वे सांभाळून संघर्ष आणि ताण तणाव कमी करून एकसंघतेने प्रगती कशी करावी, याबाबत गुरुदेव मार्गदर्शन करतील.
गुरुवार दि. ८ फेब्रु. रोजी श्री.श्री. नी महाराष्ट्रातील सरपंच, शेतकरी आणि गांव प्रतिनिधी यांना निमंत्रित केले आहे. देशाचा विकास व्हायचा असेल तर ग्रामीण भारताचा विकास होणे गरजेचे आहे. म्हणून श्री. श्री. सदोदित ग्रामीण प्रतिनिधींना भेटत, ऐकत असतात. त्यांच्या गरजा आणि समस्या जाणून घेऊन सामाजिक प्रकल्प बनवतात, राबवतात.
याचे अलीकडच्या काळातील उत्तम उदाहरण म्हणजे लातूर जिल्ह्यातील कायमच्या दुष्काळावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी ‘जल युक्त शिवार’ प्रकल्प राबवला. त्यामुळे तेथील दुष्काळाचे प्रमाण लक्षणीय कमी झाले. पुढे जाऊन हा प्रकल्प देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवला जात आहे.
या दौऱ्यात त्यांनी सरपंच, शेतकरी आणि गांव प्रतिनिधी यांना विशेष वेळ दिला आहे.
याशिवाय दररोज सायंकाळी महाराष्ट्रातील विविध विभागातील स्वयंसेवक त्यांच्या त्यांच्या स्थानिक संस्कृतीला ओळख आणि चालना मिळावी, म्हणून त्यांच्या क्षेत्रातील ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ सादर करतील. श्री. श्रीं. च्या सानिध्यात दररोज ‘महासत्संग’ आहे.
या चार दिवसीय ‘गुरु सानिध्य’ कार्यक्रमासाठी कोल्हापूर, इचलकरंजी, वारणा, कोडोली सह सांगली आणि महाराष्ट्रातील सर्वच भागातून स्वयंसेवक आणि साधक येणार आहेत. नोंदणीसाठी प्रशिक्षकांना संपर्क साधावा, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्राच्या समन्वयक गीतांजली दिदी, कोहापूरचे समन्वयक डॉ. अनिमा दहिभाते आणि सचिन मुधाळे यांनी केले आहे.
