बंगळुरू: मोटरस्पोर्ट्सच्याउत्साही लोकांमधील प्रतिभेला जोपासण्यासाठी वचनबद्ध असलेल्या टीव्हीएस रेसिंगला चारदशकांच्या मजबूत रेसिंग परंपरा आहे. आता पेट्रोनास टीव्हीएस वन मेक चॅम्पियनशिपसाठीप्रशिक्षण आणि निवडीसह पुन्हा हा थरार घेऊनआली आहे. निवड फेरी जानेवारी, फेब्रुवारी आणि मे २०२४ दरम्यान चार प्रमुख शहरांमध्येहोतील. महत्त्वाकांक्षी महिला आणि धाडसी रायडर्स यासाठी अर्ज करू शकतात आणि त्यांच्याकामगिरीच्या आधारे त्यांना वन मेक चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याची संधी मिळते. टीव्हीएस रेसिंगने२०१६ पासून देशातील ७०० हून अधिक इच्छुक महिला रेसर्सना प्रशिक्षित केले आहे. आता महिला वर्गाच्या आठ आवृत्त्यांसाठी आणि रुकी श्रेणीच्यातिसर्या आवृत्तीसाठी प्रशिक्षण आणि निवड फेरी आयोजित करण्यासाठी तयारी सुरू करण्यातआली आहे. २०२२ पासून १८ वर्षाखालील देशातील ५० हून अधिक रुकी रेसर्सना प्रशिक्षित केल्यावर,आता आगामी प्रशिक्षण सत्राचे उद्दिष्ट तरुण रेसर्स आणि इच्छुकांना मोटरसायकल रेसिंगचीआवड निर्माण करण्यासाठी संधी निर्माण करणे आहे. यावेळीबोलताना टीव्हीएस मोटर कंपनीचे बिझनेस हेड – प्रिमियम आ.श्री विमल सुंबली म्हणाले की, “टीव्हीएस रेसिंग १९८२ पासून भारतातील मोटरस्पोर्ट्ससंस्कृती वाढविण्यात एक पुढे आहे. आमच्या वन मेक चॅम्पियनशिपसह आम्ही सर्व जेंडर आणिवयोगटातील रेसिंग उत्साही लोकांसाठी त्यांच्या मोटरस्पोर्ट कारकीर्दीची सुरुवात करण्यासाठीएक डायनॅमिक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ‘रेसिंगचा झेंडा कुणाशीही भेदभाव करत नाही’या आमच्या मूळ तत्त्वज्ञानाने आम्ही २०१६ मध्ये महिला चॅम्पियनशिप सुरू करणारे पहिलेठरलो. आमची रुकी चॅम्पियनशिप ही टीव्हीएस रेसिंग फॅक्टरी रेसर बनण्याच्या शिडीवरीलपहिली पायरी आहे. आम्ही एक सर्वसमावेशक कार्यक्रम तयार केलेला आहे ज्यामध्ये संपूर्णसमर्थन आणि ट्रॅक प्रशिक्षण समाविष्ट आहे. त्याचे मोटरस्पोर्ट समुदायाने मोठ्या प्रमाणावरकौतुक केले आहे. निवडफेरीचे प्रमुख मुद्दे:
● सर्वफेऱ्यांमध्ये पेट्रोनास टीव्हीएस रेसिंगमधील राष्ट्रीय चॅम्पियन्सद्वारे आयोजित पूर्णदिवसाच्या प्रशिक्षण सत्रांचा समावेश असेल.
● प्रशिक्षणवेळापत्रक सहभागींना त्यांचे कौशल्य वाढवण्यास आणि रेसिंग मोटारसायकल आणि ट्रॅकसह परिचितहोण्यास मदत करेल
● रेसर्सनारेस-स्पेस टीव्हीएस Apache RTR 200 आणि RR 200 मोटरसायकलवर स्पर्धा करण्याची संधी मिळेल.
● याप्रशिक्षणांमुळे शॉर्टलिस्टेड रेसर्सना २०२४ इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिप(INMRC) पूर्वी त्यांची शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात मदतहोईल.
● सहभागींनारेसिंग गीअर्सचा संपूर्ण संच देखील मिळेल – सूट, हातमोजे आणि बूट (उपलब्धतेनुसार)
