कोल्हापूर, १३ जून २०२४: केसांना रंग देण्यासाठी बाजारपेठेत कृत्रिम रसायनांवर आधारित अनेक हेअर कलर्स उपलब्ध आहेत. परंतु त्यांच्या घातक परिणामांमुळे अनेक जणांना इच्छा असूनही केसांना रंग देता येत नाही. यावर पर्याय म्हणून नैसर्गिक घटक असलेल्या ‘निशा’च्या हेअर कलर्सना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘निशा’च्या वतीने आतापर्यंत क्रीम हेअर कलर, शाम्पू, कंडिशनर, साबण, सॅनिटायझर, अशी अनेक कॉस्मेटिक उत्पादने सादर करण्यात आली आहेत. यातही नैसर्गिक हेअर कलर्सनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘निशा’, युथिका’, ‘नीता’, व इतर प्रमुख ब्रँड नावाने सादर झालेल्या या उत्पादनांनी महाराष्ट्रासोबतच देशविदेशात गेल्या ७० वर्षांपासून उत्पादने बाजारात आहेत.
निशा हेअर कलरमध्ये मुख्यतः मेहंदीचा वापर करण्यात आला आहे. मेहंदी हे एक नैसर्गिक रंगद्रव्य असून भारतीय संस्कृतीत आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये प्राचीन काळापासून त्याचा वापर होत आहे. याशिवाय, यामध्ये जास्वंद, कोरफड, शिकाकाई असे अन्य नैसर्गिक घटकही असून केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे खास महत्त्व आहे.
कंपनीविषयी माहिती देताना युतिका नॅच्युरल्स प्रा. लिमिटेडचे संचालक जे. एन. गहलोत म्हणाले, “अनेक पिढ्यांपासून आम्ही नैसर्गिक घटकांवर आधारित सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करत आहोत. आज आमची मेहंदी व मेहंदीआधारित उत्पादने भारतासोबतच ६० पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात होत आहेत. त्यामुळेच आज कंपनीची उलाढाल वार्षिक ४०० कोटींपेक्षा अधिक झाली आहे.”
ते पुढे म्हणाले, की हा नवीन मेहंदीआधारित हेअर कलर केसांच्या रंगाबरोबरच आरोग्याची देखील काळजी घेणारेउत्पादन ठरणार आहे. याचा वापर केल्याने ग्राहकांना नैसर्गिक आणि ताजातवाना अनुभव मिळतो. नैसर्गिक घटकांमुळे याचा वापर सुरक्षित आहे. त्यामुळेच केसांना रंग देऊन सौंदर्य वाढविण्याबरोबरच त्याचे दुष्परिणाम टाळण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी हा हेअर कलर अत्यंत उपयुक्त आहे.
मेहंदीचे विशेष लाभ
मेहंदीआधारित हेअर कलर वापरण्याचे अनेक फायदे आहेत. हे केसांना नैसर्गिक रंग देण्याबरोबरच केसांच्या मुळांची देखील काळजी घेते. मेहंदीमध्ये असलेल्या अँटीऑक्सीडंट्स आणि न्यूट्रिएंट्समुळे केसांना पोषण मिळते आणि त्यांची ताकद वाढते. शिवाय या उत्पादनात कोणतेही हानिकारक केमिकल्स वापरण्यात आलेले नाहीत. त्यामुळे याचा वापर सुरक्षित असून कोणताही साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता नाही. यामुळे केस गळणे, अॅलर्जी आणि अन्य समस्यांना तोंड द्यावे लागत नाही.
‘युतिका’ चे सर्व ब्रॅण्डस प्रमुख दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. ऑनलाइन तसेच ऑफलाइन स्टोअर्समध्ये तसेच विविध सुपरमार्केट्स आणि कॉस्मेटिक स्टोअर्समध्येही ही उत्पादने मिळू शकतात.