कोल्हापूर/प्रतिनिधी : मसाई पठार जवळ कोरगावकर ग्रुप कडून उभा करण्यात आलेल्या आचला फार्म हाऊस पर्यटकांचा सेवेत दाखल झाले आहे. या फार्मचे उद्घाटन डी. वाय. एस.पी स्वाती गायकवाड सौ.शुभलक्षमी विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोल्हापूरकडे सध्या पर्यटकांचा ओढा वाढत चालला आहे.आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध स्थळे ही पर्यटकांसाठी खास आकर्षण आहेत त्यातच पन्हाळा हा खास
आकर्षणआहे.
पन्हाळा.शाहूवाडी,कोल्हापूर,आणि वारणानगर या सर्व ठिकाणाहून पर्यटकांना आणि कोल्हापूरकरांना जवळ असणारे हे आचला फार्म राहण्यासाठी आणि लहान मुलांसाठी महत्वपूर्ण असणार आहे.याठिकाणी धमाल मस्ती ही लहान मुलांना करता येणार आहे.हे फार्म हाऊस पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले असून याठिकाणी अवश्य भेट द्यावी असे राज कोरगावकर यांनी सांगितले आहे.
या उद्घाटनप्रसंगी अपटी सरपंच आशिष पाटील,वेखंडवाडी सरपंच संतोष खोत,जेऊर सरपंच भाऊ पाटील पन्हाळा मंगळवार पेठ सरपंच गोरख जामदार,कॉन्ट्रॅक्टर अजय पाटील,ग्रामपंचायत सदस्य सौ खेतल आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जेऊर हायस्कूल मधील बालवाडीच्या विद्यार्थ्यांना बेंच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी कोरगावकर ग्रुपचे राज कोरगावकर,अनिकेत कोरगावकर,आकाश कोरगावकर आदी उपस्थित होते.