करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला मिळाली सुवर्ण झळाळी

कोल्हापूर: तब्बल दीड किलो सोनं, अडीच ते तीन कोटी रुपये किंमत, मूळ तांब्याचा 200 किलो वजन असलेला तेरा फूट उंच सोन्याचा मुलामा असलेला कळस आज बसवल्याने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मुख्य शिखराला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली. अधिक मासातील आज शुक्रवारी विधिवत पूजा करून हा सुवर्ण कळस बसवण्यात आला आहे. देशभरातून कोल्हापुरात दाखल झालेल्या लाखो भाविकांनी हा सुवर्णक्षण अनुभवला. लवकरच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने कलशारोहण सोहळा होणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून देण्यात आली.
आदिशक्ती आई अंबाबाई चरणी देश-विदेशातून लाखो भाविक दान अर्पण करत असतात. गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी आई अंबाबाईला अर्पण केलेला सुवर्णकलश बसवण्याचं काम गुरुवारी मध्यरात्री हाती घेण्यात आलं होतं. 30 कारागिरांच्या सहाय्याने हे काम सुरू होतं. शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुवर्ण कलश बसवून पूर्ण झाला. यानंतर विधिवत पूजा करण्यात आली. अधिक मास आणि शुक्रवार असा दुहेरी योग शुक्रवारी जुळून आल्याने मंदिराच्या मुख्य शिखरावर सोन्याचा कळस आज बसवण्यात आला. हा कळस पाहण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. सध्या मंदिरात गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड पुनर्जीवित करण्याच्या कामासह विविध कामे सुरू आहेत. ही कामं पूर्ण झाल्यानंतर विधिवत कलशारोहण सोहळा पार पडेल अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे मावळते सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली आहे.
मणिकर्णिका कुंड, गरुड मंडपाच्या कामाला गती – राज्य शासनाच्या वतीने अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा उद्घाटन केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्याचं नियोजन केलं जात आहे. याच अनुषंगाने अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड पुनर्जीवित करण्याच्या कामाला सध्या गती येत असून मंदिराचा मूळ आराखडा तसाच ठेवून अंबाबाई मंदिरात वरील पाच शिखरे, मंदिराच्या आतील नक्षीकाम करण्यात येत आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा मानस असल्याचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सांगितलं.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर