शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र शहीद विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूर, दि. 12 : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावणारे शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र वीर जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांना वीरमरण आले. या वीर सुपुत्राच्या पार्थिवावर आज गोंडोली येथील वारणा नदीच्या तीरावर शासकीय इतमामात आणि साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद विक्रम चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण शाहूवाडी तालुक्यातील विद्यामंदिर गोंडोली येथे झाले होते, तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोकरूड येथील यशवंत महाविद्यालयातून पूर्ण केले होते. देशसेवेची आवड असल्याने त्यांनी सैन्यात प्रवेश केला आणि अहिल्यानगर येथे आपले लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१८ मध्ये राजस्थानमधील सुरतगड येथे त्यांची पहिली पोस्टिंग झाली, तर दुसरी नियुक्ती जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे झाली होती. सध्या ते जम्मू-काश्मीरमधील उरी येथे 8 आरआर (राष्ट्रीय रायफल्स) मध्ये देशसेवा बजावत होते.
शहीद जवान विक्रम चव्हाण यांचे पार्थिव मूळ गावी गोंडोली येथे आणण्यात आल्यानंतर, ‘वीर जवान विक्रम चव्हाण अमर रहे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कोल्हापूरमधून तालुक्यात जाताना आणि गावात असंख्य लोकांनी त्यांच्या योगदानाला अभिवादन करत पुष्पवृष्टी केली. पार्थिव काही काळ घरी ठेवण्यात आले; त्यानंतर वारणा नदीच्या तीरावर लष्कराच्या आणि पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून या वीर सुपुत्राला अंतिम सलामी दिली आणि शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार सीमा सोनवणे, सभापती प्रियांका भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी, सैन्यदलाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील माजी सैनिक आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिक या वीर सुपुत्राला साश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
विक्रम चव्हाण यांच्या निधनाने चव्हाण कुटुंबातील कमावता आणि हसताखेळता आधार हिरावला गेल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, मोठा भाऊ, तीन विवाहित बहिणी, पत्नी आणि अवघ्या तीन वर्षांची चिमुकली मुलगी वीरा असा परिवार आहे. अंत्यसंस्कारावेळी चिमुकल्या वीराच्या आणि पत्नीच्या आक्रोशाने उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले होते.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर