बायरकडून भारतात अल्पभूधारक शेतकऱ्यांना अत्याधुनिक कीड व्यवस्थापनाद्वारे मदत करण्यासाठी ट्रान्स सादर

भारत, २२ जुलै २०२६ – बायरने आज ‘ट्रान्स’ या नावीन्यपूर्ण कीटकनाशकाची बाजारातील प्रवेशाची घोषणा केली. हे कीटकनाशक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी अशा रस शोषणाऱ्या कीट समूहांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास उपयुक्त ठरेल. एकाच उत्पादा मध्ये दोन प्रभावी कार्यपद्धती एकत्र करून ‘ट्रान्स’ व्यापक नियंत्रण देते, ज्यामुळे पिकांचे आरोग्य सुधारते आणि पिकाची उत्पादकता व शेतकऱ्यांचा नफा वाढतो. हे उत्पादन जुलै २०२६ पासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब आणि हरियाणा अशा प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये उपलब्ध होईल.
भारतातील कापूस लागवडीला एकाच वेळी अनेक रस शोषणाऱ्या किडींना सामोरे जावे लागते. कीटकामध्ये वाढणारी प्रतिकारशक्ती, अनेक प्रकारच्या कीटकांचा एकाच वेळी प्रादुर्भाव आणि कीट व्यवस्थापनासाठी मर्यादित उपायांमुळे पिकाला सतत वाढत्या दबावाला सामोरे जावे लागत आहे. या आव्हानांमुळे अनेकदा पिकांची वाढ खुंटते, उत्पन्न कमी होते आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो.
या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विकसित केलेले ‘ट्रान्स’ दोन प्रगत रसायनांना एकत्र आणते ज्यांची कार्यपद्धती एकमेकांना पूरक आहे. आधुनिक शेतीसाठी तयार केलेले ट्रान्स हे पिकामध्ये दुहेरी मार्ग प्रणाली आणि पर्णपटल-पार क्रियेने काम करते. ज्यामुळे विद्यमान पाने आणि नवीन येणारी पाने या दोन्हींचे संरक्षण शक्य होते. याचे पर्जन्य-प्रतिरोधक सूत्र, फवारणीनंतर दोन तासांनंतर होणाऱ्या पाऊसमूळे याच्या असरकारकते मध्ये काही बाधा आणत नाही. याच बरोबर एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रमांमध्ये ‘ट्रान्स’ सहजपणे सामावू शकते ज्यामुळे अधिक शाश्वत पीक संरक्षण पद्धती शक्य होते.
प्रभावी कीड नियंत्रणापलीकडे जाऊन ‘ट्रान्स’ पिकाच्या निरोगी वाढीद्वारे पिकाचे आरोग्य जपण्यास मदत करते. हे कीटकांचे जलद अन्नग्रहण थांबवून, पाने अधिक स्वस्थ करते आणि वारंवार पीक संरक्षणाचा हस्तक्षेप कमी करून गुंतवणुकीवरील परतावा व उत्पादन क्षमताही सुधारते.
या उत्पादनाबाबत बोलताना बायरच्या क्रॉप सायन्स विभागाचे, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सी.ओ.ओ.) मोहन बाबू म्हणाले, “बायरमध्ये शेतकऱ्यांच्या बदलत्या आव्हानांना समजून घेऊन नवीन उत्पाद निर्मितीची सुरुवात होते. अनेक कीटकांचा एकत्र प्रादुर्भाव आणि वाढती प्रतिरोधक क्षमता यामुळे रस शोषणाऱ्या कीड समूहांचे व्यवस्थापन करणे अधिकाधिक कठीण झाले आहे. ट्रान्स दोन पूरक कार्यपद्धतींना एकाच नाविन्यपूर्ण उपायात एकत्र आणते. त्यातून प्रभावी आणि शाश्वत कीड व्यवस्थापन मिळते आणि शेतकऱ्यांना पिकाचे आरोग्य, उत्पादकता आणि नफा सुधारण्यास मदत करते.”
ट्रान्स बाजारात उपलब्ध करताना बायर आपले पीक संरक्षण उत्पाद संग्रह अधिक मजबूत करत आहे. कंपनी विज्ञानावर आधारित नवनिर्मिती सादर करत असून त्यातून शेतकऱ्यांना संसाधनांचे जतन करण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठीच्या आपल्या प्रयत्नांमध्ये पुढचे पाऊल टाकत आहे.
ट्रान्स १०० मिली, २२० मिली आणि ५०० मिली पॅकमध्ये उपलब्ध असेल.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर