एचडीएफसी म्युच्युअल फंड तर्फे देशभरातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नारी निवेश यात्रा’चा शुभारंभ

मुंबई:एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या नारी निवेश यात्रेचा मुंबई येथून 9 जून रोजी शुभारंभ झाल्यानंतर गोव्यातील टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. देशव्यापी गुंतवणूकदार शिक्षण आणि जनजागृतीसाठी राबविण्यात आलेला हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असून या यात्रेद्वारे शहरातील नागरिकांशी संवाद साधत माहितीपूर्ण गुंतवणूक, दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि आर्थिक सहभाग वाढविण्यास प्रोत्साहन देण्यात आले.घरगुती आर्थिक निर्णयप्रक्रिया आणि संपत्ती निर्मितीमध्ये महिलांची वाढती भूमिका लक्षात घेऊन नारी निवेश यात्रा ही देशभरातील समुदायांपर्यंत थेट गुंतवणूकदार शिक्षण पोहोचविण्याच्या उद्देशाने सहा महिन्यांच्या व्यापक जनसंपर्क कार्यक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत दोन कॅन्टर्स भारतभर दोन वेगवेगळ्या दिशांनी प्रवास करत असून अनेक शहरे आणि गावांना भेटी देत त्यांचा समावेश करत आहेत. प्रत्येक ठिकाणी एचडीएफसी म्युच्युअल फंड समुदाय सहभाग उपक्रम आयोजित करत आहे. यामध्ये नुक्कड नाटक (पथनाट्य) तसेच परस्परसंवादी गुंतवणूकदार जनजागृती सत्रांचा समावेश असून त्याद्वारे महत्त्वाच्या आर्थिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या जातात आणि गुंतवणुकीविषयी संवादाला चालना दिली जाते.गोव्यातील टप्प्यादरम्यान नारी निवेश यात्राने गोवा मार्केट, अंजुना फ्ली मार्केट, द गोवा कलेक्टिव्ह बाजार, एम.एम.सी. न्यू मार्केट,तिबेटन मार्केट आणि मापुसा मार्केट या प्रमुख ठिकाणांवरील स्थानिक समुदायांशी संवाद साधला. नुक्कड नाटक, गुंतवणूकदार जनजागृती सत्रे आणि समुदाय संवादाच्या माध्यमातून आर्थिक नियोजन, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मिती या विषयांवरील चर्चा शहरातील महिलांपर्यंत थेट पोहोचविण्यात आली.या यात्रेचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे तळागाळातील महिलांशी थेट संवाद साधणे. या मोहिमेदरम्यान एचडीएफसी म्युच्युअल फंड देशभरातील महिला स्व मदत गटांसोबत 60 विशेष सत्रांचे आयोजन करणार आहे. या सत्रांद्वारे आर्थिक नियोजन, उद्दिष्टाधारित गुंतवणूक, दीर्घकालीन संपत्ती निर्मिती आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या सवयी विकसित करण्याचे महत्त्व या विषयांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.या उपक्रमाबाबत बोलताना एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नवनीत मुनोत म्हणाले, “भारतभरात महिलाच अनेकदा घरातील सर्वात शिस्तबद्ध बचत करणाऱ्या असतात. मात्र, वैयक्तिक आर्थिक नियोजनाविषयी योग्य संवादच अनेकांपर्यंत कधीच पोहोचला नसल्याने नियोजनबद्ध गुंतवणूक त्यांच्यापासून दूर राहिली आहे. नारी निवेश यात्रा ही अशाच संवादाभोवती उभी करण्यात आली आहे. पथनाट्ये, समुदाय सत्रे आणि स्व-मदत गटांशी थेट संवादाच्या माध्यमातून आम्हाला हा संवाद थेट महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे. गुंतवणूक ही काही गुंतागुंतीची किंवा दूरची गोष्ट नसून, त्यांच्या मनातील आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयुक्त आणि व्यवहार्य साधन आहे, याची जाणीव त्यांना करून द्यायची आहे.”

  • Related Posts

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    नॅशनल : खऱ्या भावना आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अनुभव मांडणाऱ्या कथा प्रेक्षकांसमोर आणण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवत मराठी झी5वर ‘अडकित्ता’चा प्रीमियर 11 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. नातेसंबंध, कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    प्रोजेक्ट ओपन रिव्ह्यू २.० अंतर्गत एआय प्लसचा ‘नोव्हा २ पॉवर’ स्मार्टफोन सादर

    प्रोजेक्ट ओपन रिव्ह्यू २.० अंतर्गत एआय प्लसचा ‘नोव्हा २ पॉवर’ स्मार्टफोन सादर