एका प्रसिद्ध आयुर्वेदिक ब्रँडने आपल्या संस्कृतीतून प्रेरित कॅम्पेनद्वारे आधुनिक काळातील वेदनांपासून आराम मिळवण्याचा उपाय सादर केला आहे – असा उपाय जो Gen Z ग्राहकांना नक्की आवडेल.
कोलकाताः तुम्ही अशा पिढीचा विश्वास कसा जिंकाल जी जाहिराती स्किप करते, कोणतीही बनावट गोष्ट ओळखते आणि वेदना सहन करण्यास नकार देते?
ईमामी लिमिटेडच्या परिवारातील झंडु बाम कडून, उत्तर साधे आहे: Gen Z ला उपदेश देऊ नका. त्यांच्याशी त्यांना आवडणाऱ्या पद्धतीने बोला.
या नवीन कॅम्पेनमधे #UndoWithZandu, भारताचा नंबर 1 वेदना निवारक बाम, Gen Z च्या दृष्टिकोनातून वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करते. स्क्रीन पाहण्यातून होणारी डोकेदुखी आणि मानदुखी, डूमस्क्रोलिंगमुळे थकवा आणि दैनंदिन त्रास या आजच्या तरूण ग्राहकांना लगेच ओळखता येईल अशा “वेदना” दाखवल्या जातात.
कॅम्पेनमध्ये मध्यभागी “पेनलँड” आहे – एक काल्पनिक जागा जिथे तरूण लोक आधूनिक आयुष्यातल्या वेदना आणि अडचणींशी लढताना दिसतात. त्या वेळी एक उत्साही व्यक्तिमत्त्व त्यांच्या समोर येईल जो त्यांच्या सर्व समस्या सोडवेल आणि फक्त एका साध्या सूचनेने त्यांना आराम मिळवून देईलः “वेदनेला करा अनडू विथ झंडु”
हे कॅम्पेन झंडु बामसाठी एक धोरणात्मक बदल दर्शवते ज्याचा उद्देश 16-28 वयोगटातील ग्राहकांशी जोडण्याचा आहे जे सातत्याने डिजिटल क्रियाकलाप आणि शारीरिक थकव्यामुळे रोजच्या वेदनांशी सामना करतात. यासह ब्रँडने लोकांच्या दैनंदिन संघर्षासाठी उपाय म्हणून स्वतःला स्थापन करण्याच्या आणि प्रत्येक पिढीच्या ग्राहकांमध्ये ओळख निर्माण करण्याच्या आपल्या घ्येयाच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे.
जेव्हां वारसा संस्कृतीला भेटतो
काही दशकांपासून झंडु बाम हे भारतीय परिवारांसाठी एक विश्वस्नीय नाव आहे. ते आपल्या आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनसाठी ओळखले जाते जे डोकेदुखी, अंगदुखी आणि सामान्य सर्दीपासून त्वरित आराम देते. जरी उत्पादनांच्या वैशिष्ट्यांमध्ये काही बदल झालेले नसतील, तरी लोकांच्या वेदनेबद्दलच्या मतांमध्ये नक्की बदल झाला आहे.
ही समज एका सर्वसाधारण सत्यापासून सुरू होते: Gen Z समस्या टाळत नाही. ते लगेच याच्या समाधानांचा मार्ग शोधतात. एक पिढी जी स्वतः माहिती गोळा करते आणि मनात असेल ते स्पष्ट बोलते, कारण Gen Z फक्त अस्वस्थता सहन करायला तयार नाही, ते त्याचा सामना थेट करतात.
म्हणून झंडु बामने वेदनेला फक्त शरीरिक ‘वेदने’ पर्यंत मर्यादित ठेवले नाही, तर त्याने ह्यात दैनंदिन त्रासांनासुद्धा समाविष्ट केले आहे – करिअरचा तणाव आणि बर्नआउट पासून ते सिच्युएशनशीप ड्रामा, गरजे पेक्षा जास्तं विचार करणे आणि सोमवारी पुन्हा कामावर जाण्याची चिंता. त्याचा परिणाम असा की मनोरंजन, सांस्कृतिक आधार आणि प्रोडक्टचा उपयोग दर्शवून एक कॅम्पेन, ज्याला आजकालच्या गोष्टींमघून सांगण्यात आले आहे.
ह्या कॅम्पेनबद्दल बोलताना श्री. मोहन गोयनका, डायरेक्टर, ईमामी लिमिटेड म्हणाले, “झंडु बामने ज्या प्रकारे लोकप्रिय संस्कृतीत आपले स्थान निर्माण केले आहे, तशा पद्धतीने फार कमी ब्रँड्सने हे स्वीकारले आहे. लोकप्रिय गाणं ‘मुन्नी बदनाम हुई’ असलेले लक्षात राहील. अशा जाहिरातीने भारताच्या जाहिरात क्षेत्रात एक बदल घडवून आणला; हे अतिशय लोकप्रिय होते आणि ब्रँडची ओळख पिढ्यांदर पिढ्यांमध्ये घट्ट केली. त्या वारशाला पुढे नेऊन आमचा #UndoWithZandu, चा पुढाकार सर्व वयोगटांमध्ये आवडता राहून त्यांच्यामध्ये बांधिलकी दर्शवते. हे आजकालच्या डिजिटलरीत्या जोडलेल्या ग्राहकांच्या दैनंदिन वेदना आणि दुखापतींना एका नवीन मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करते. परंपरागत ब्रँडसाठी असलेले आव्हान फक्त आपले महत्त्व कायम ठेवण्यापूरता मर्यादित नाही तर ते साततत्याने टिकवून ठेवण्यामध्ये आहे. अनेक पिढ्यांपासून भारतीय लोक त्यांच्या घरात झंडु बामवर विश्वास ठेवतात सर्व प्रकारच्या वेदनेंपासूनच्या आरामासाठी. आम्ही पुढच्या पिढीकडूनही तोच मजबूत विश्वास मिळवण्याचा आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत प्रगती करण्याचे ध्येय ठेवु इच्छितो. ”
फक्त एका कॅम्पेनपेक्षा अधिक. एक नवीन सांस्कृतिक अनुभूती.
भारतीय रूबिफेशिएट श्रेणीचे मूल्य रु. 6,000 कोटि रूपयाहून अधिक असून, बामचा भागचे मूल्य ₹1,500 कोटि रूपये आहे. प्रभावी, सुरक्षित आणि सोयीस्कर समाधान शोधणाऱ्या ग्राहकांसाठी टॉपिकल पेन रिलिफ अजुनही आवडती निवड आहे. ही परिस्थिती लक्षात ठेवून झंडु बामच्या नवीन उपक्रमाचा उद्देश तरुण ग्राहकांशी त्यांचे नाते मजबूत करणे आणि या श्रेणीत आपले स्थान अधिक घट्ट करणे आहे.
हे कॅम्पेन ट्री कम्युनिकेशंस आणि अब्बास मिर्जाद्वारे तयार करण्यात आले आहे. याला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगाल सारख्या प्रमुख बाजारांमध्ये टेलिव्हिजन, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, ओटीटी आणि सोशल मिडियामध्ये रोल-आउट करण्यात येत आहे.
कारण, Gen Z कडून ब्रँड्सने काही शिकले आहे, तर ते हे आहेः जरी जीवनात आपल्याला होणाऱ्या वेदना बदलत असतील, तरी ग्राहकांना अशा समाधानांची गरज आहे जे त्वरित आराम देतात.
किंवा झंडु बामच्या नव्या तत्त्वज्ञानानुसारः प्रत्येक वेदनेला करा #UndoWithZandu.






