जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

मुंबई, महाराष्ट्र: जे. जी. पी. ज्वेलर्स यांनी २५ स्टोर्सच्या पूर्णत्वाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी खास ऑफर म्हणजेच ‘गोल्ड एक्स्चेंज फेस्टिवल’ जाहीर केला असून हा त्यांच्या या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे.सहा दशकांपासूनचा विश्वास, शुद्धता आणि सुंदर कारागिरीची परंपरा असलेले जे. जी. पी. ज्वेलर्स हे ग्राहकांचे दागिने खरेदीसाठीचे खात्रीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘गोल्ड एक्स्चेंज फेस्टिवल’ याचे प्रयोजन ग्राहकांना त्यांच्या जुन्या दागिन्यांपासून आजच्या नव्या काळातील आवडी निवडी प्रमाणे दागिने घडवणे आहे, शिवाय घडणावळीवर भरघोस सूट मिळणार आहे. त्याचबरोबर सोन्याच्या शुद्धतेची तपासणी व तज्ञांच्या मार्गदर्शनाने ही ‘गोल्ड एक्स्चेंज’ प्रक्रिया त्यांच्याकडील कॅरेटमिटरच्या सहाय्याने सोन्याच्या गुणवत्तेनुसार योग्य दर देईल यात शंका नाही.
या फेस्टिवल बद्दल बोलताना, सानिका पेडणेकर, क्रिएटिव्ह डायरेक्टर, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स म्हणाल्या: “सहा दशकांपासून जे. जी. पी. ज्वेलर्स ग्राहकांच्या सर्वात जिव्हाळ्याच्या क्षणांचा आणि कौटुंबिक परंपरांचा एक भाग राहिली आहे. घरोब्याचे संबंध असलेल्या अनेक ग्राहकांच्या लेकी आजी-पणजीचे दागिने आता जुन्या स्टाइलचे झाले म्हणून मोडून नवीन करून घेतात. याच अनुभवाने या २५ दुकानांच्या टप्प्यावर, ‘गोल्ड एक्स्चेंज’ फेस्टिवलच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या जुन्या दागिन्यांना मॉडर्न स्टाईल अनुसार घडवण्याचा आणि ग्राहकांना खुष करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
जे. जी. पी. ज्वेलर्स बद्दल: सन १९६५ मध्ये स्थापित, जे. जी. पी. ज्वेलर्स (जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स) हा महाराष्ट्र व गोवा येथील सुप्रसिद्ध ज्वेलरी ब्रॅंड आहे. शुद्धता, उत्तम कारागिरी व विश्वास या मूल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या विविध सोनं, चांदी व हिरे यांनी निर्मित‍ अलंकार हे त्यांच्या ६० वर्षाहून अधिक चालत आलेल्या परंपरेचे प्रतीक आहेत.

  • Related Posts

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    राष्ट्रीय, 9 ऑक्टोबर 2026: एखाद्या चक्रात अडकल्यावर मुक्तीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यवस्थेचा सामना करण्यास भाग पाडले जाते; ज्यावरचा विश्वास त्याने एकदा गमावला होता. अशास्थितीत नेमके काय घडते? आनंद दिलीप…

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    कोल्हापूर : आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीजअंतर्गत येणाऱ्या बिर्ला ओपस पेंट्सने ‘बाप्पाचा मान’ या उपक्रमातून कोल्हापूरमधील गणेशोत्सवाच्या सर्जनशीलतेचा आणि सामुदायिक सहभागाचा गौरव केला. या उपक्रमाला शहरातील हाउसिंग सोसायट्यांकडून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार