कोल्हापूर,: जागतिक वस्त्रोद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे व्यासपीठ असलेले ‘इंडिया आयटीएमई २०२६’ हे भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन ४ ते ९ डिसेंबर २०२६ दरम्यान ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट (आयईएमएल) येथे आयोजित करण्यात येणार आहे. जागतिक वस्त्रोद्योग तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या, तज्ज्ञ आणि उद्योगातील भागधारकांना एकाच छताखाली आणणारे हे प्रदर्शन नव्या तंत्रज्ञानाची ओळख, उद्योगातील नवकल्पना आणि व्यावसायिक संधींसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाचा भक्कम पाठिंबा, तसेच ८० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योग संघटनांचे सहकार्य व सहभागातून साकारलेले ‘इंडिया आयटीएमई २०२६’ हे केवळ प्रदर्शन नाही, तर वस्त्रोद्योग यंत्रसामग्री आणि वस्त्रोद्योग अभियांत्रिकी क्षेत्रातील संपूर्ण परिसंस्थेला एकत्र आणणारे सहकार्य, नवकल्पना आणि औद्योगिक प्रगतीचे जागतिक व्यासपीठ आहे.
जगभरातील ४० हून अधिक देशांचा सहभाग आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित यंत्रसामग्रीची ३,६०० हून अधिक थेट प्रात्यक्षिके, २० विविध विभागांमध्ये सादर होणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन उत्पादनं आणि नाविन्यपूर्ण उपाय भारताचे जागतिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील वाढते महत्त्व अधोरेखित करतात. हे प्रदर्शन केवळ तंत्रज्ञानाचे व्यासपीठ नसून, नव्या व्यावसायिक संधी, तंत्रज्ञानविषयक भागीदारी आणि जागतिक व्यापार संबंधांना नवी दिशा देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. प्रदर्शक आणि अभ्यागतांसाठी नव्या बाजारपेठा शोधण्याची, व्यावसायिक जाळे विस्तारण्याची आणि जागतिक स्तरावर सहकार्याची नवी दालने खुली करण्याची ही एक उत्तम संधी आहे.
इंडिया आयटीएमई २०२६ मध्ये उद्योगविश्वासाठी संधींची नवी दालने खुली होणार आहेत. बीटूबी बैठका, ‘टेक्सटाईल होरायझन्स’ (वस्त्रोद्योग क्षेत्रातील मर्यादा) ही आंतरराष्ट्रीय परिषद, नवीन उत्पादनांचे अनावरण आणि उद्योग-केंद्रित नेटवर्किंग उपक्रम अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल या प्रदर्शनात अनुभवायला मिळणार आहे. पारंपरिक प्रदर्शनाच्या पलीकडे जात, हे व्यासपीठ उद्योगातील तज्ज्ञ, उत्पादक, व्यावसायिक आणि जागतिक भागीदारांना एकत्र आणणार आहे. नव्या व्यावसायिक संधी, तंत्रज्ञानविषयक माहितीची देवाणघेवाण आणि अर्थपूर्ण व्यावसायिक सहकार्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण पर्वणी ठरणार आहे.
द सीईओ सभा/ अधिवेशन – व्हिजन बोर्ड (नवोदित उपक्रम मंडळ) ते परस्परसंवादी उद्योग संवाद. वस्त्रोद्योगाचे भविष्य घडवण्यासाठी एकत्र येणार उद्योगविश्वातील दिग्गज.
वस्त्रोद्योग उत्पादन आणि वस्त्रोद्योग यंत्रसामग्री क्षेत्रांतील वरिष्ठ नेतृत्वाला एका प्रभावी व्यासपीठावर आणणारा ‘द सीईओ कॉन्क्लेव्ह’ म्हणजे विचारांची देवाणघेवाण, सहकार्याच्या नव्या संधी आणि उद्योगाच्या प्रगतीसाठी सामूहिक व्हिजन (दूरदृष्टी) घडवणारा संवाद. आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळांच्या सहभागातून या सभेमध्ये निर्माण होतील जागतिक नेटवर्किंगच्या नव्या संधी, तंत्रज्ञानविषयक भागीदारीचे मार्ग, ज्ञानाची देवाणघेवाण आणि व्यापार सुलभतेसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य.
वस्त्रोद्योग क्षेत्राशी अधिक दृढ संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि उद्योगातील प्रमुख घटकांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘इंडिया आयटीएमई सोसायटी’तर्फे सुरत, अहमदाबाद आणि इंदूर येथे विशेष रोडशोज आणि पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘इंडिया आयटीएमई २०२६’ या भव्य प्रदर्शनाची व्यापक जागरूकता निर्माण करण्यासोबतच, अभ्यागत आणि प्रदर्शकांसाठी उपलब्ध असलेल्या व्यावसायिक संधींची माहिती दिली जाणार आहे. तसेच, वस्त्रोद्योग आणि संबंधित क्षेत्रांतील उद्योजक, उत्पादक आणि व्यावसायिकांना या महत्त्वपूर्ण प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.






