भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

राष्ट्रीय, 9 ऑक्टोबर 2026: एखाद्या चक्रात अडकल्यावर मुक्तीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यवस्थेचा सामना करण्यास भाग पाडले जाते; ज्यावरचा विश्वास त्याने एकदा गमावला होता. अशास्थितीत नेमके काय घडते? आनंद दिलीप गोखले लिखित आणि दिग्दर्शित; मंजिरी सुबोध भावे यांच्या कान्हाज् मॅजिकची निर्मिती असलेली कोण यशवंत पानसरे? म्हणजे न्याय, सत्ता आणि सत्याशी संबंधित गुंतागुंतीच्या छेदनबिंदूचा शोध घेणारा हा एक खिळवून ठेवणारा कोर्टरूम ड्रामा तसेच एक तपास-आधारित थरारपट आहे. समीक्षकांनी गौरवलेल्या तमिळ Zee5 सिरीजच्या ‘सत्तामुम नीधियम’ वरून रुपांतर केलेली ही मालिका, एका व्यक्तीचा अपराधीभाव आणि आत्म-संशयावरुन धैर्य तसेच सुटकेच्या खोलवरील वैयक्तिक प्रवासाचा मागोवा घेताना आव्हानात्मक व्यवस्थेच्या परिणामांचा अभ्यास करते. भरत जाधव, शिवानी रांगोळे, पुष्कर श्रोत्री, शर्वरी जमेनीस, उज्ज्वला जोग, विद्याधर जोशी, मिलिंद फाटक यांच्या सहज अदाकारीने नटलेल्या ‘कोण यशवंत पानसरे?’ चा प्रीमियर दिनांक 16 ऑक्टोबर 2026 रोजी मराठी Zee 5 वर होणार आहे.
‘कोण यशवंत पानसरे’ ही मालिका तपास आणि कोर्टरूम ड्रामाचा अनोखा संगम सादर करते. अलका बेपत्ता होण्यामागील रहस्य उलगडत असताना कथा न्यायालयीन प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन अनेक पैलू समोर आणते. यशवंत पानसरे यांचा न्यायासाठीचा लढा हा केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित राहत नाही, तर तो त्यांच्या भूतकाळाला सामोरे जाण्याचा आणि वकील म्हणून स्वतःची ओळख पुन्हा सिद्ध करण्याचा वैयक्तिक प्रवास ठरतो. न्यायाच्या शोधात असलेली व्यक्ती आणि शक्तिशाली संस्थात्मक तसेच राजकीय व्यवस्था यांच्यातील संघर्षही या मालिकेतून अधोरेखित होतो. जनहित याचिकेचे रूपांतर हेबिअस कॉर्पस सुनावणीत होत असताना, प्रत्येक नवा खुलासा प्रेक्षकांना सत्य परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडतो. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तींचे म्हणणे व्यवस्थेकडून दुर्लक्षित राहिल्यास त्याचे परिणाम काय होऊ शकतात आणि व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी एखादी व्यक्ती उभी राहिल्यास पुढे काय घडते, याचा शोध ही मालिका घेते. यशवंत पानसरे यांच्या व्यक्तिरेखेला अभिनेता भरत जाधव यांनी वेगळ्या आणि दमदार स्वरूपात साकारले आहे. या भूमिकेतील भावनिक गुंतागुंत, असुरक्षितता आणि व्यक्तिरेखेची खोली त्यांनी प्रभावीपणे उलगडली आहे.
अभिनेता भरत जाधव म्हणाले, “यशवंत पानसरे हे एक असे पात्र आहे जे त्या व्यक्तिरेखेच्या पदरामुळे मला निराळे वाटले. तो एक असा माणूस आहे ज्याने अपयश अनुभवले आहे. स्वत:च्या भूतकाळाचे ओझे उचलले आहे आणि स्वतःवरील विश्वास जवळजवळ गमावला आहे. त्याच्या प्रवासाला मनोरंजक बनवणारी गोष्ट म्हणजे तो अचानक नायक होत नाही; त्याला लढाईत पुन्हा ढकलले जाते कारण त्याच्या समोर जे घडते त्याकडे तो दुर्लक्ष करू शकत नाही. जेव्हा तो अलका बेपत्ता झाल्याचा तपास सुरू करतो, तेव्हा त्याला केवळ व्यवस्थेचाच नव्हे तर स्वतःच्या भीतीचा आणि अपराधीपणाचा देखील सामना करावा लागतो. कोर्टरूम एक अशी जागा बनते जिथे त्याला हळूहळू स्वत:चा आवाज पुन्हा सापडतो. तो सर्व गुंत्यातून स्वत:च्या मुक्तीचा मार्ग शोधतो. मला विश्वास आहे की प्रेक्षकांना ‘पानसरे’च्या प्रवासाची भावनिक बाजू आपलीशी वाटेल. ते गूढ आणि कथेत हरवतील. न्याय, सत्य तसेच संस्थात्मक जबाबदारीबद्दलचे प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होतील.”
अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणाला, “मला सारडाकडे ज्या गोष्टीने आकर्षित केले ती गोष्ट म्हणजे तो निव्वळ कोर्टरूममध्ये पानसरेसमोर उभा राहणारा माणूस नाही. तो एक असा वकील आहे. ज्याला व्यवस्था, तिची कार्यपद्धती आणि त्यासोबत येणारी शक्ती समजते. ज्यामुळे पानसरेशी असलेल्या त्याच्या संघर्षाला अनेक पदर फुटतात. त्यांच्यातील न्यायालयीन देवाणघेवाण केवळ युक्तिवाद जिंकण्याबद्दल नसून कायदा, न्याय आणि व्यवस्थेवरील दोन अतिशय भिन्न दृष्टीकोन प्रतिबिंबित करतात. सारडा साकरण्यासाठी विशिष्ट संयमाची आवश्यकता होती. कारण त्याच्यातील अधिकार दर्शवायचा होता. नाट्यकलेपेक्षा त्या भूमिकेत असलेला संयम अनुभवातून येतो. कोण यशवंत पानसरे? न्यायाविषयी काही अतिशय संबंधित प्रश्नांचा शोध घेतो. जेव्हा महत्त्वपूर्ण संस्था लोकांची सेवा करण्यासाठी असतात, त्या लोकांकरिता काम करताना अपयशी ठरतात तेव्हा काय घडते आणि त्या प्रश्नांचा उलगडा प्रेक्षकांना कधी होतो याची मी वाट पाहत आहे.”
अभिनेत्री शिवानी रांगोळे म्हणाली, “जान्हवी ही अशी व्यक्ती आहे जी वयाचा, अनुभवाचा किंवा एखाद्या गोष्टी करण्याच्या प्रस्थापित पद्धतींचा स्वीकार करण्यास नकार देते. आपण किती दूर जाऊ शकतो हे स्वत: ठरवते. मला तिच्याबद्दल सर्वात मनोरंजक वाटणारी बाब म्हणजे तिची निर्भयता! जी तिच्या दृढनिश्चयातून येते – इतरांनी आदर्श म्हणून काय स्वीकारले आहे यावर प्रश्न विचारायला ती तयार असते. पानसरे यांच्याशी तिचा संबंध देखील कथेचा एक महत्त्वाचा भाग बनतो, कारण ते वेगवेगळ्या टप्प्यांतून या प्रकरणाकडे जात असताना, ते दोघेही आपापल्या पद्धतीने व्यवस्थेला आव्हान देतात. भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री यांच्यासोबत कोर्टरूम ड्रामा आणि तपासादरम्यानच्या कथेवर काम करणे हा एक अद्भुत शिकण्याचा अनुभव होता. ‘कोण यशवंत पानसरे’ माझ्याकरिता खास का आहे? तर ती प्रेक्षकांसोबत राहील. कारण धैर्य, सत्य आणि न्यायाचा शोध हा कथेचा आत्मा आहे.”
लेखक-दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले, “कोण यशवंत पानसरे? व्यवस्था उत्तरे शोधणे बंद करते म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती बंद करण्यात येणाऱ्या खटल्याला विरोध दर्शवते तेव्हा काय घडते यावर ही कथा भाष्य करते. यशवंत पानसरे या व्यक्तिरेखेने भूतकाळातील अपयशामुळे आधीच स्वतःचा एक भाग गमावला आहे. हे प्रकरण त्याला त्या अपयशाचा सामना करण्यास भाग पाडते. न्यायालयीन कामकाज आणि तपास कथा पुढे नेत असताना पानसरे यांचा भावनिक प्रवासही तितकाच महत्त्वाचा ठरतो. आम्हाला एक अशी कथा तयार करायची होती जिथे प्रत्येक पुरावा, प्रत्येक साक्ष आणि प्रत्येक प्रकटीकरण आपलेसे वाटेल. त्यावर प्रश्न विचारायला भाग पाडू शकेल. प्रेक्षकांनी या जगाचा अनुभव घ्यावा आणि पानसरे न्याय, सत्य आणि शेवटी मुक्तीचा शोध घेत असताना प्रेक्षकांनी मनाने या प्रक्रियेत सामील व्हावे; यासाठी मी उत्सुक आहे.”

  • Related Posts

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    कोल्हापूर : आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीजअंतर्गत येणाऱ्या बिर्ला ओपस पेंट्सने ‘बाप्पाचा मान’ या उपक्रमातून कोल्हापूरमधील गणेशोत्सवाच्या सर्जनशीलतेचा आणि सामुदायिक सहभागाचा गौरव केला. या उपक्रमाला शहरातील हाउसिंग सोसायट्यांकडून…

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    कोल्हापूर, : स्कोडा ऑटो इंडियाने नवीन स्लावियाच्या किंमती जाहीर केल्या असून, तिच्या डिलिव्हरीला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. नवीन स्लाविया युरोपियन डिझाइन, दमदार कामगिरी, आधुनिक तंत्रज्ञान, आराम आणि सुरक्षितता यांचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर 16 ऑक्टोबर रोजी कोण यशवंत पानसरेचा प्रीमियर

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    बाप्पाचा मान’ उपक्रमातून कोल्हापूरमधील कम्युनिटीजच्या सर्जनशीलतेचा गौरव

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    नवीन स्कोडा स्लाविया सर्व काही सांगते—शैली, सार्थकता आणि आत्मविश्वासाचा संगम

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    एआय प्लसच्या नोव्हा आणि प्लस मालिकेवर बिग बिलियन डेजमध्ये विशेष सणासुदीच्या किंमती

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    सोनाली बेंद्रे यांनी केला ‘सोहळा’चा ट्रेलर लॉन्च; बालपण आणि मोठं होण्याच्या सुंदर प्रवासाची झलक

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार

    एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक; ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार