सॅनीने आपल्या नवीन, अत्याधुनिक उत्पादनांचे एक्सकॉन २०१९ मध्ये उदघाटन करून ब्रँड पोर्टफोलिओच्या शक्ती व प्रभावाचे दमदार प्रदर्शन केले आहे
उपकरणे, साधनसामग्री यांचे उत्पादन करणाऱ्या जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक सॅनी ब्रॅंडने एक्सकॉन २०१९ या बांधकाम तंत्रज्ञान, उपकरणे, यंत्रांच्या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या प्रदर्शनामध्ये १२ पेक्षा जास्त नवी उत्पादने सादर केली आहेत. सीआयआयने इंडियन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सहयोगाने आयोजित केलेल्या एक्सकॉन २०१९ मध्ये भारत आणि परदेशातील तब्बल १२५० पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी होत आहेत. उद्योगक्षेत्रातील विचारवंत, धोरणकर्ते, व्यावसायिक आणि व्हेंडर्स यांना एका मंचावर आणणाऱ्या या मेगा ट्रेड फेअरमुळे सॅनीला आपली नवी उत्पादने सादर करण्याची उत्तम संधी मिळाली आहे. नवीन उत्पादनांच्या बरोबरीनेच आधीपासून बाजारपेठेत असलेली तसेच आधुनिक डिझाईन, सर्वोत्तम डिझाईन, सहजसोपे संचालन आणि विश्वसनीयता यासाठी जगभरात नावाजली जाणारी कन्स्ट्रक्शन मशीन्सची श्रेणी देखील या प्रदर्शनात सादर करण्यात आली आहे. सॅनीच्या स्टॉलमध्ये आधुनिक एक्सकेव्हेटर्सची संपूर्ण श्रेणी, ट्रक क्रॉलर, सर्व भूप्रदेशांमध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या क्रेन्स, रस्ते बांधकामात वापरली जाणारी यंत्रे, ग्रेडर्स, खाणकामातील यंत्रे, पायलिंग रिग यांचा समावेश आहे. ही सर्व उत्पादने ग्राहकांमध्ये अतिशय नावाजली जात आहेत. सॅनीची नव्याने दाखल करण्यात आलेली उत्पादने त्यांच्या डीलर्स व थेट विक्री नेटवर्कमार्फत संपूर्ण भारतभर लवकरच उपलब्ध करवून दिली जातील.
सॅनी इंडियासाठी एक्सकॉन २०१९ चा पहिला दिवस अतिशय महत्त्वाचा ठरला. पहिल्याच दिवशी एसआरईआय फायनान्सकडून सॅनीच्या १३० एक्सकेव्हेटर्सची डिलिव्हरी ऑर्डर नोंदविली गेली आहे. यावेळी श्री. दीपक गर्ग (एमडी, दक्षिण आशिया व सॅनी इंडिया), श्री. धीरज पांडा (डायरेक्टर सेल्स, मार्केटिंग व कस्टमर सपोर्ट), श्री. संजय सक्सेना (हेड, एचई व काँक्रीट बीयु), श्री. शशांक पांडेय (हेड, एक्सकेव्हेटर बीयु), श्री. अरुण रघुनाथ (हेड, कस्टमर फायनान्स) यांच्यासह एसआरईआय फायनान्सकडून श्री. डीके व्यास (एमडी) आणि श्री. अमित डांग (प्रेसिडेंट) हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सॅनी साऊथ एशिया आणि सॅनी हेवी इंडस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. दीपक गर्ग यांनी यावेळी सांगितले, “एक्सकॉन २०१९ या बांधकाम उद्योगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान व यंत्रसामग्री प्रदर्शनामध्ये भाग घेताना आणि याठिकाणी आमच्या नवीन उत्पादनांचे उदघाटन करताना आम्हाला अतिशय अभिमान व आनंद वाटत आहे. बांधकाम क्षेत्रातील दिग्गज एक्सकॉनला आवर्जून भेट देतात आणि म्हणूनच आमची नवी यंत्रे याठिकाणी प्रदर्शित करणे योग्य आणि लाभदायक देखील आहे. आमच्या ब्रँडची शक्ती व प्रभाव ग्राहकांसमोर प्रदर्शित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.” सॅनी ब्रँडच्या भविष्यातील विस्तार आणि वाढीच्या महत्त्वाकांक्षी योजनांबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी पुढे सांगितले, “गेल्या काही वर्षात भारतातील आमच्या वाटचालीचा आलेख कायम चढता राहिला आहे. सॅनी ग्रुपने भारताला नेहमीच एक महत्त्वाची बाजारपेठ मानले आहे. भारतीय ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करतील आणि “क्वालिटी चेंजेस द वर्ल्ड” अर्थात “गुणवत्ता जगात परिवर्तन घडवून आणते” हे कंपनीचे घोषवाक्य खरे करवून दाखविणारी उत्पादने सादर करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. श्रेणीतील सर्वोत्तम उत्पादने, सर्वोत्कृष्ट साहाय्य व्यवस्था, कुशल मेहनती मनुष्यबळ आणि विशाल, मजबूत डीलर नेटवर्क यांच्या बळावर आम्ही भारतातील बांधकाम उपकरणांच्या उद्योगक्षेत्रातील तीन आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्थान मिळवू याची आम्हाला पक्की खात्री आहे.”
प्रदर्शनामध्ये सादर करण्यात आलेली सर्व उत्पादने तंत्रज्ञान दृष्टया अतिशय आधुनिक आणि सर्वोत्तम असून याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत. सॅनीची काही उत्पादने आणि त्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
१. एसवाय२६० ब्रेकर एक्सकव्हेटर आणि एसवाय२८५सी-९ लॉन्ग रीच एक्सकव्हेटर
खडक फोडीच्या कामामध्ये वापरले जाणारे आणि १८ मीटर लांबपर्यंत पोहोचू शकणारे हे भारतातील पहिले कस्टमाइज्ड एक्सकव्हेटर आहेत. कठीण आणि अवजड कामे लीलया पार पाडेल अशी रचना, सर्वाधिक योग्य पद्धतीने वजन वाटले जाईल असे तंत्रज्ञान यामुळे सर्व ग्राहकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात व त्यांचा उपकरणांवरील खर्च पुरेपूर वसूल होतो. एसवाय२६०बीएममध्ये २६-३५टी या क्लासच्या रॉक ब्रेकरशी जुळवून घेण्याची क्षमता असल्यामुळे उच्च उत्पदनाच्या गरजा हे पूर्ण करते. एसवाय२८५सी-९एलआर हे उच्च क्षमतेच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने बनविण्यात आले असून त्यामध्ये १८ मी व १४ मी लांब खोदकाम करण्याची क्षमता आहे.
२. भारतातील सॅनीचा पहिला व्हील्ड एक्सकव्हेटर – एसवाय१५५डब्ल्यू
नव्याने डिझाईन करण्यात आलेल्या एसवाय१५५डब्ल्यू व्हील्ड एक्सकव्हेटरमध्ये बांधकाम व औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे. यामध्ये १६१ अश्वशक्तीचे शक्तिशाली व इंधन बचत क्षमता असलेले इसुझू इंजिन असून सॅनीच्या आधुनिक पॉझिटिव्ह फ्लो हायड्रउलिक कंट्रोल सिस्टिममुळे अधिक चांगले परिणाम मिळतात आणि इंधनाची बचत देखील होते. या मशीनचा वेग दर तासाला ३७ किमी असून त्यामुळे एका कामाच्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने पोहोचून कामे जलद गतीने पार पाडण्यात मदत होते.
३. सॅनीच्या लार्ज क्लास एक्सकव्हेटर्सची १०-सीरिज: एसवाय३८०सी-१०एचडी, एसवाय५००सी-१०एचडी आणि एसवाय८००सी-१०एचडी
लार्ज क्लास एक्सकव्हेटर्सची १०-सीरिज आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असून आमच्या खाण उद्योगातील ग्राहकांसाठी सर्वोत्तम सुविधा आहे. शक्तिशाली, इंधन बचतीमध्ये सक्षम, विश्वसनीय आणि खाणकामासाठी खास रचना, सीआरडीआय इंजिनासारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान, ताण, प्रवाह तूट कमी करणारे तंत्रज्ञान, प्रभावी व इंटेलिजंट मोड कंट्रोल सिस्टिम, नवीन अल्ट्रा सायलेंट आणि डस्ट प्रूफ कॅब तंत्रज्ञान, जागतिक दर्जाची रचना, परीक्षण व्यवस्था आणि देखरेख करण्याची सहज सुविधा ही सर्व वैशिष्ट्ये यामध्ये आहेत.
४. सॅनीचे भारतातील पहिले व्हील लोडर – एसवायएल९५६एच५
एसवायएल९५६एच५ हा विशाल व्हीलबेस ५टी अवजड कामे करू शकण्याची क्षमता असलेला लोडर आहे. खाणकाम उद्योगातील ग्राहकांच्या अतिजास्त उत्पादन गरजा पूर्ण करण्यासाठी हा उपयुक्त आहे. इलेक्ट्रॉनिक इंजेक्शन इंजिन, संवेदनशील व सहज बोटांनी करता येण्याजोगे संचालन, पायलट सिस्टिम, इलेक्ट्रॉनिकली नियंत्रित करण्याजोगा शिफ्टिंग गियरबॉक्स, ऊर्जेची बचत करणारी, सक्षम, व्यवहार्य डिस्प्लेसमेंट इंटर-फ्लो हाय प्रेशर हायड्रॉलीक सिस्टिम आणि इलेक्ट्रॉनिकली नियंत्रित करण्याजोगा फुल हायड्रॉलीक पार्किंग ब्रेक ही आधुनिक वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. शक्ती, प्रेषण, स्टिअरिंग आणि हायड्रॉलीक व्यवस्था यांचा अतुलनीय मिलाप असलेल्या एसवायएल९५६एच५ मुळे वेग, शक्ती, इंधन बचत आणि विश्वसनीयता हे सर्व लाभ मिळतात.
५. ट्रक क्रेन एसटीसी२५०सी
चेसिसची वजन वाहून नेण्याची क्षमता वाढविताना आम्ही आमच्या २५ टन ट्रक एसटीसी २५० सी मध्ये आधुनिकीकरण करून प्रवासादरम्यान अधिक जास्त नियंत्रण आणि स्थिरता आणली आहे. याशिवाय आम्ही वजन उचलण्याची क्षमता देखील वाढविली आहे. अधिक वजनाच्या कामांसाठी मेन बूम लांबी ३३.५ मीटर करण्यात आली आहे.
६. ट्रक क्रेन एसटीसी५००सी एसटीसी५००सी हे सॅनीचे सर्वात नवीन उत्पादन आहे. अधिक जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता, शक्तिशाली इंजिन आणि ड्राइवलाईन ही याची वैशिष्ट्ये आहेत. अधिक वजनाच्या वेगवेगळ्या कामांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. रिफायनरी, ऊर्जा प्रकल्प, रस्ते व मेट्रो प्रकल्प इत्यादींच्या वजन उचलण्याच्या गरजा ओळखून याची रचना करण्यात आली आहे.
७. क्रॉलर क्रेन एससीसी४५०ए:
एससीसी४५०ए हा भारतातील क्रेन बाजारपेठेतील नवीन शोध आहे. विशेष ट्रॅक, वजन वाहून नेण्याची क्षमता आणि वाहतूक व्यवस्था ही याची वैशिष्ट्ये आहेत. ही मशीन तीन वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जाऊ शकते – पायलिंग कॉंक्रीटिंग, स्ट्रक्चरल प्लांट उभारणी आणि इतर पारंपरिक क्रेन्स उपयोगी पडू शकणार नाहीत अशी विशिष्ट कामे
८. टेलेस्कोपिक क्रॉलर क्रेन एससीटी६००:
टेलेस्कोपिक क्रॉलर क्रेन एससीटी६०० हे देखील भारतीय बाजारपेठेतील नवीन उत्पादन आहे. ही मशीन प्रीकास्ट, प्लांट आणि उभारणी, मेट्रो आणि लांबलचक पाईप कामात वापरली जाऊ शकत असल्यामुळे क्रेन कामात त्यामुळे नवी क्रांती घडून येईल. अधिक जास्त वेग आणि क्षमता ही याची वैशिष्ट्ये आहेत.
९. एसकेटी९०एस – विशाल बॉडी असलेला डम्प ट्रक
खाणकाम उद्योगात नव्या क्षमता प्रदान करून क्रांती घडवून आणेल असे हे एसकेटी९०एस मॉडेल आहे. हा विशाल बॉडी असलेला डम्प ट्रक भारतात पहिल्यांदा आणला जात आहे. जागतिक दर्जाचे आधुनिक डिझाईन, परीक्षण पद्धती वापरून हे मॉडेल अधिक जास्त विश्वसनीय आणि कमी खर्चाचे बनविण्यात आले आहे. खाणींच्या कठीण वातावरणात देखील याचा सक्षमतेने वापर करता येतो. ऑटोमॅटिक व मॅन्युअल ट्रान्समिशन असे दोन पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात.
सॅनीचे हायड्रॉलीक एक्सकव्हेटर्स, पायलिंग मशिनरी, क्रॉलर क्रेन्स, मोबाईल पोर्ट मशिनरी आणि रोड मशिनरी हे सर्वोत्तम मानले जातात तर त्यांची काँक्रीट मशिनरी ही जगातील सर्वोत्तम आहे. स्वतंत्ररित्या नाविन्यपूर्ण संशोधनातून सॅनीने ६६ मीटर पम्प ट्रक, ७२ मीटर पम्प ट्रक आणि ८६ मीटर पम्प ट्रक विकसित केले आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकाने उंचीचे विश्व विक्रम मोडले आहेत. सॅनीने जगातील पहिले फुल हायड्रॉलीक मोटर ग्रेडर, ग्रॅज्युएशन ३ सह काँक्रीट देणारा जगातील पहिला पम्प, जगातील पहिले नॉन-बबल बिट्यूमिनस मॉर्टर वाहन, जगातील सर्वात मोठी ३६०० टन क्षमतेची क्रॉलर क्रेन, जगातील पहिले संपूर्ण सेट असलेले मॉर्टर सुविधा युनिट, आशिया खंडातील पहिली १००० टन क्षमतेची सर्व भूप्रदेशात वापरता येईल अशी क्रेन आणि अशी इतर अनेक उत्पादने तयार केली आहेत.