मराठी चित्रपट ग्लोबल करण्यास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ प्रयत्नशील :अध्यक्ष मेघराज राजेभोसले
कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शाहू सांस्कृतिक भवन मार्केट यार्ड येथे आयोजित करण्यात आलीयं.यावेळी सर्व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येणार असून मराठी चित्रपट ग्लोबल करण्यास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ प्रयत्नशील असल्याच अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची २०१६ पासून नवीन कार्यकारणी अस्तित्वात आलीयं.तर महामंडळाच्या मागील वर्षी जानेवारी महिन्यात त्रैवार्षिक सर्वसाधारण सभेत ठरल्याप्रमाणे एका वर्षाच्या आत यंदा वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आल्याच अध्यक्ष राजेभोसले यांनी सांगितले. यावेळी बोलताना राजेभोसले म्हणाले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निर्माता ते स्फाँट बाँय यांना एकत्र घेवून काम करत आहे. महामंडळाचे ४५ हजार सभासद असून सभेत चित्रपटसृष्टी ग्लोबल होण्यासाठी चर्चा होणे गरजेचे आहे.महामंडळाचे चित्रपटांच्या प्रमोशनसाठी स्वतंत्र युट्यूब चँनल सुरू करण्यात आले असून डीजीटल मिडीयात महामंडळाने प्रवेश केला आहे. निर्माते व तंत्रज्ञ यांच्यातील आर्थिक तक्रारी निवारणासाठी महामंडळाने हमी पत्र चालू केले आहे. स्री कंलावंतासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार विशाखा समितीची स्थापना करण्यात आली आहे. तर कोल्हापूर, पुणे येथे स्वमालकीचे आँफीस उभारले आहे. यासह विविध कामे मार्गी लावण्यास चित्रपट महामंडळ यशस्वी ठरले आहे. दरम्यान जास्तीत जास्त मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर नेण्यास महामंडळ प्रयत्नशील असून चित्रपट अनुदान योजनेतील गुणांकन पद्धती बदलून श्रेणी पद्धत चालू करावी व निर्मात्यांना अनुदान वेळेवर मिळावे यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याचे राजेभोसले यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर मराठी चित्रपट,कलाकार, निर्माते यासह मराठी चित्रपटसृष्टी संलग्न असणाऱ्यां सर्व गोष्टींचा विकास करण्यासाठी अनेक योजना ,प्रस्ताव अंजिठ्यावर असल्याचे यावेळी अध्यक्ष मेघराज राजेभोसले सांगितले.
पत्रकार परिषदेला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर,सहखजिनदार शरद चव्हाण, कायदेशीर सल्लागार अॅड.प्रशांत पाटील, संचालक सतीश रणदिवे उपस्थित होते.