पत्रकार दिनानिमीत्त सुनंदन लेले यांचे व्याख्यान
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे दरवर्षीप्रमाणे पत्रकार दिनानिमीत्त सोमवारी (दि.६) राजर्षि शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे सायंकाळी ४.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर ॲड. सुरमंजिरी लाटकर असणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थीत जेष्ठ क्रिडा समीक्षक सुनंदन लेले हे प्रमुख उपस्थीत असून ते क्रीडा पत्रकारीता आणि समाज या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी प्रसिद्ध केली आहे.
मेस्त्री म्हणाले, प्रेस क्लबतर्फे दरवर्षी पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीही मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडणार आहेत या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थीती मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची असणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ठ पत्रकार आणि कॅमेरामन पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रिंट मिडीयातील उत्कृष्ठ पत्रकार संतोष मिठारी, उत्कृष्ठ छायाचित्रकार इम्रान गवंडी, इलेट्रॉनीक मिडीया उत्कृष्ठ पत्रकार विश्वास पाणारी, उत्कृष्ठ कॅमेरामन मिथुन राज्याध्यक्ष यांना गौरवण्यात येणार आहे.
प्रेस क्लबचे सर्व सभासद, माध्यम समूहातील सर्व पदाधिकारी-कर्मचारी,जाहिरात एजन्सी बांधव यांनी आपल्या कुटूंबासमवेत कार्यक्रमाला उपस्थीत रहावे असे आवाहन प्रेस क्लब संचालक मंडळाने केले आहे.