महानता ही उंचीनुसार नव्हे, प्रतिभेमुळे मिळते. प्रत्येक उंचीमधून प्रतिभा दिसून येते आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील काही अद्वितीय कलाकारांनी दिखाव्याबाबत असलेले सामाजिक समज मोडून काढले आहेत आणि त्यांची पॅशन पूर्ण केली आहे. त्यांनी अथक मेहनत घेत क्षेत्रामध्ये आपली छाप पाडली आहे. आपल्या अद्वितीय अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकलेल्या टेलिव्हिजन क्षेत्रातील या छोट्या धमाक्यांचे योगदान व प्रतिभांची प्रशंसा व कौतुक करण्याची वेळ आली आहे.
