कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर येथील विन्स हाॅस्पिटलमध्ये अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे अत्याधुनिक यंत्रसामग्री च्या सहकार्याने देवगड तालुक्यातील मटाक येथील मनोज यशवंत प्रभू (वय – ४२)याच्या मेंदूत लागलेली बंदूकीची गोळी यशस्वीपणे काढून त्याला जीवदान देण्यात यश आलयं. अशी माहिती विन्स हाॅस्पिटलचे मेंदू तज्ञ डॉ. संतोष प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर येथील डॉ. संतोष प्रभू यांचे विन्स हाॅस्पिटल हे मेंदू विकारांवरील सुप्रसिद्ध हाॅस्पिटल आहे.तर डॉ. प्रभू यांना आतापर्यंत आपल्या ३० वर्षाच्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेत डोक्यात बंदूकीची गोळी लागून हाॅस्पिटलमध्ये दाखल झालेल्या चार रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात यश आलयं. जागतिक आकडेवारीनुसार ५ टक्के रुग्ण अशा प्रकारात वाचण्याची शक्यता असते.दरम्यान
देवगड तालुक्यातील मटाक येथील ४२ वर्षीय मनोज प्रभू याच्या डोक्याच्या मागील भागामध्ये दिं.२२ जानेवारी रोजी बंदुकीची गोळी लागली होती. ही गोळी मेंदूच्या मागच्या बाजूस अंत्यत अवघड भागात म्हणजे ब्रेन स्टेम जवळ घुसली होती.असे रुग्ण वाचवणे खूप अवघड आणि जोखमीचे असतं.मात्र मेंदूतज्ञ डॉ. संतोष प्रभू यांनी अत्याधुनिक यंत्रसामग्री ,बुद्धी कौशल्य,तंत्रज्ञानाचा वापर करत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे मनोज प्रभू याच्या मेंदूत लागलेली बंदूकीची गोळी काढून त्याला जीवदान दिलयं. यावेळी मेंदूतून बंदुकीची गोळी काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया तब्बल पंधरा वर्षानंतर केल्याच ही डॉ. प्रभू यांनी स्पष्ट केलयं.तर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेला रुग्ण मनोज प्रभू सध्या हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असून तो पूर्णतः बरा असल्याचे डॉ. प्रभू यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला डॉ. सुजात प्रभू ,रुग्ण मनोज प्रभू उपस्थित होते.