कोल्हापूर/प्रतिनिधी: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, जरगनगर यांच्यावतीने सामाजिक जाणीवेतून अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात. अद्यावत भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, स्पेस इनोव्हेशन लॉब, योगा वर्ग, लहान मुलांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासठी फिरते वाचनालय असे उपक्रम वर्षभर सुरु असतात. याचाच एक भाग म्हणून दरवर्षी मोठ्या प्रमाणात “रक्तदान” शिबिराचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी हे “रक्तदान” शिबीर उद्या रविवार दिनांक १ मार्च रोजी भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, जरगनगर येथे सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळेत आयोजित करण्यात आले आहे. आपले रक्तदान हे अनेकांसाठी जीवनदान ठरू शकते. शेतकरी, कष्टकरी, सैनिक, गोर-गरीब, सर्वसामान्य नागरिक या साऱ्यांना मदतीच्या उद्देशाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी १००० बाटली रक्त संचयाचा संकल्प भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने करण्यात आला आहे.
तरी या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून रक्ताची नाती जपण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.