कोल्हापूर ता.4 : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पाʉर्ाभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. पहिल्या टप्यामध्ये दि.18 मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 144319 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 628532 नाग्रीकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्यामध्ये दि.18 मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 145102 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 643961 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्यात दि.3 जून 2020 रोजी 8405 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 33460 नागरीकांची तपासणी करण्यात आली. सदरचे सर्व्हेक्षण ब्रम्हेʉार पार्क, जोशी नगर, विजय नगर, इंगवले गल्ली, शोले नगर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, माकडवाला वसाहत, महाडीक कॉलनी, बाजार गेट, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, तोरस्कर चौक, पंचगंगा तालीम, साळोखेनगर, गणेश कॉलनी, नरके कॉलनी, बापूराम नगर, देवकर पाणंद, प्रथमेश नगर, आपटेनगर, संभाजीनगर, महालक्ष्मी मंदिर, मंगळवार पेठ, सिध्दाळा गार्डन परिसर, विचारे माळ, सदरबाजार, कदमवाडी, जाधववाडी, ताराबाई पार्क, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, नाना पाटील नगर, रामानंद नगर, जरग नगर, सुभाषनगर, जवाहरनगर, नेहरुनगर, म्हाडा कॉलनी, ताराराणी कॉलनी, राजेंद्रनगर, पोवार मळा या ठिकाणी घरोघरी जाऊन करण्यात आले. या तिसऱ्या टप्यामध्ये आज अखेर 154895 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 669907 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. सदरचा सर्व्हे हा 11 नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचा-यांमार्फत करण्यात आला आहे.