पुणे : आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, हे पुण्याचे पहिले जेसीआय आणि एनएबीएच अधिस्वीकृत रुग्णालय असून आयएसओ 22000:2005; एचएसीसीपी, सीएपी (युएसए) आणि एनएबीएल या अन्य अधिस्वीकृत्या रुग्णालयाला लाभल्या आहेत. या ठिकाणी 58 वर्षीय महिलेचे अॅडव्हान्स स्टेज 4ए सर्व्हायकल कॅन्सर सोबत मूत्राशयाची दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
सोनल (नाव बदलले आहे), ही 58 वर्षीय महिला रजोनिवृत्ती पश्चात रक्तस्त्रावाने पीडित होती. हा रुग्ण सर्विक्स कॅन्सरग्रस्त असल्याची शक्यता वाटल्याने त्यांना आमचे कन्सल्टंट गायने ऑन्कोलॉजीस्ट डॉ. निखील पर्वते यांचे नाव सुचविण्यात आले होते. रुग्ण महिलेत जाणवणाऱ्या विकाराच्या शक्यतेचे अचूक निदान व्हावे यादृष्टीने त्यांचे सीटी, ईयुए, बायोप्सी आणि डायग्नोस्टीक लॅप्रोस्कोपी करण्यात आली.
सर्व प्रकारच्या निदान विषयक चाचण्या करून झाल्यावर महिला रुग्ण हा अतिशय दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या अॅडव्हान्स स्टेज 4ए सर्व्हायकल कॅन्सरने ग्रस्त असून मूत्राशय देखील बाधित असल्याचे निदान झाले. या प्रकरणात आश्चर्याची बाब म्हणजे महिलेचे उदर आणि ओटीपोट मात्र सामान्यरितीने काम करत होते.
सर्व्हायकल कॅन्सर पसरण्याची ही नैसर्गिक पद्धत नव्हती. त्यामुळेच ट्युमर बोर्डाकडे या प्रकरणाची चर्चा झाली. जिथे अगदी कन्सल्टंट, युरोलॉजी डॉ. आनंद धारस्कर, तसेच जी.आय. सर्जन डॉ. प्रकाश वळसे यांनी भाग घेतला. याविषयी बराच विचार विनिमय आणि चर्चा झाली.
सरतेशेवटी रुग्ण महिलेला एन्टेरिअर पेल्विक एक्सेंटेरेशन सोबत आयलीयल कॉंडीटसोबत पर्मनंट युरोस्टोमा, वर्सस कॉनकरंट सीटी+ आरटीचा पर्याय देण्यात आला आणि या प्रकारात अन्य समस्या, जसे भविष्यात फिस्तुला होण्याची शक्यता अधिक असते.
रुग्ण महिला आणि तिच्या नातेवाईकांना परिस्थितीची संपूर्ण माहिती करून देण्यात आली. त्यांना अन्य डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी तसेच विचार करण्यासाठी अवधी देण्यात आला. दहा दिवस अनेकदा चर्चा झाल्यानंतर (ज्यामध्ये क्लिनिकल सायकोलॉजीस्ट, स्टोमा केअर तज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट सहभागी होते) रुग्ण महिला आणि तिच्या नातेवाईकांनी शेवटी शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारला.
ही दुर्मीळ शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ते दस्तावेज, मंजुऱ्या घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, गायने ऑन्को सर्जन, युरोलॉजीस्ट, जी. आय. सर्जन आणि अतिशय तज्ज्ञ अॅनेस्थेशिया टीम सज्ज झाली. ही सर्जरी 8 तास चालली. पुढील भागातील पेल्विक सर्जरी पूर्ण झाली, युरिनरी ब्लॅडरसह सर्व लम्फ नोड्स आणि पोट, प्लीहा (स्प्लीन) तसेच यकृत (लिव्हर)मधील कप्प्यात साचलेली चरबी काढून टाकण्यात आली. कायमस्वरूपी कृत्रिम मूत्राशय मल विसर्जनासाठी मार्गिका काढण्यात आली आणि अपेक्षित परिणाम गाठले गेले. शस्त्रक्रियेशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असलेले टीममधील प्रत्येक सदस्य नियमितपणे रुग्ण महिलेला भेटत होते. तिच्या शस्त्रक्रिया पश्चात काटेकोर देखभालीकडे लक्ष पुरविण्यात येत होते. रुग्ण तसेच नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येत होती. सुमारे 7 दिवसानंतर रुग्ण घरी परतण्यासाठी सज्ज झाला. रुग्ण स्वत:ची दैनंदिन कामे स्वतंत्रपणे करत असल्याची खातरजमा करण्यात आली. रुग्ण महिला कृत्रिमरीत्या तयार केलेल्या (स्टोमा)ची काळजी स्वत:ची स्वत: घेऊ लागल्या.
“रुग्ण सेवेतील प्रत्येक व्यक्तीसाठी हा मोठा दिलासा ठरला. अतिशय कठीण मार्गदर्शन सत्रे आणि सर्जरीनंतर रुग्ण आणि तिच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्ही सुखावलो. रुग्णाचे जीव वाचले. तिच्या नातेवाईकांना (रुग्ण महिलेकरिता) जाणवणाऱ्या यातनांपासून सुटका झाल्याने ही हॉस्पिटलच्या दृष्टीने मोठी कामगिरी ठरली”, असे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे म्हणाल्या.
“मला स्टेज 4ए कॅन्सर आहे हे ऐकल्यावर भीतीच वाटली होती. माझ्या आणि कुटुंबियांच्या दृष्टीने ती स्थिती तणावजन्य होती. आता आपले आयुष्य केमो यातना, केस गळती आणि जीवलगांना होणारा मनस्ताप पाहण्यात खर्ची होणार, या विचाराने पोटात गोळाच आला होता. मी एक रुग्ण म्हणून आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या सेवेबद्दल सर्व डॉक्टरांची ऋणी आहे. त्यांनी मला कठीण स्थितीत मदत केली”, अशा शब्दांत रुग्ण महिला सोनल यांनी भावनांना वाट करून दिली.