कोल्हापूर : १५ डिसेंबर २०२०: तुम्ही १०० टक्के शुद्ध मध सेवन करत आहात याबाबत तुम्ही खात्रीपूर्वक सांगू शकता का? अलिकडील काळात मधाच्या दर्जासंदर्भात ग्राहकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. ग्राहकांच्या या शंकाचे निरसन करण्यासाठी सफोला हा सर्वात विश्वसनीय ब्रॅण्ड ग्राहकांना ते खरेदी करत असलेली प्रत्येक मधाची बॉटल दर्जात्मक असण्याच्या खात्रीसाठी स्वत:हून सफोला हनी सर्टिफिकेट ऑफ प्युरिटी मिळवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
पूर्णत: भारतीय बीकिपर्सकडून (मधमाशांचे पालन करणारे) स्रोत मिळवले जाणारे सफोला हनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त युएसएफडीए नोंदणीकृत कारखान्यामध्ये उत्पादित केले जाते आणि दर्जासंदर्भात प्रबळ तपासणींची खात्री घेतली जाते. तसेच ते एफएसएसएआयने (फूड सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्डस् ऑथोरिटी ऑफ इंडिया) जारी केलेल्या प्रत्येक दर्जात्मक घटकांचे पालन करतात. सफोला हमी देते की, सफोला हनीची प्रत्येक बॅच एनएमआर चाचणी (न्युक्लीअर मॅग्नेटिक रिसॉनन्स चाचणी) केलेली आहे. एनएमआर ही जगातील सर्वात प्रगत चाचण्यांपैकी एक चाचणी आहे आणि मधामधील भेसळीचे निदान करण्यासाठी गोल्ड-स्टॅण्डर्ड मानली जाते. अंतिम उत्पादनामध्ये अतिरिक्त गोडव्याची भर न होण्याच्या खात्रीसाठी पॅकेजिंगच्या वेळी मधाची चाचणी केली जाते. मध १०० टक्के शुद्ध असल्याच्या खात्रीसाठी सफोला हनीच्या प्रत्येक बॅचची दर्जात्मक प्रयोगशाळांमध्ये एनएमआर (न्युक्लीअर मॅग्नेटिक रिसॉनन्स) तंत्रज्ञानाचा वापर करून चाचणी करण्यात येते.
मधाची प्रक्रिया व पॅकेजिंगच्या वेळी लक्षणीयरित्या मध दूषित होण्याची शक्यता असते. म्हणून मध १०० टक्के शुद्ध असण्यासोबत त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसण्याच्या खात्रीसाठी अंतिम उत्पादनाच्या प्रत्येक बॅचची चाचणी करणे महत्त्वाचे आहे. एनएमआर तंत्रज्ञानासह चाचणी जागतिक स्तरावर भेसळीचे निदान करण्यासाठी सर्वात प्रबळ पद्धत म्हणून मान्यताकृत आहे. या चाचणीमधून मधामधील शुद्धता व दर्जा नियंत्रणाची खात्री मिळते.
सफोला सर्टिफिकेट ऑफ प्युरिटी हे अन्न दर्जा व हमी प्रमाणपत्र आहे. या प्रमाणपत्राचा अर्थ असा की, विक्री करण्यात आलेल्या प्रत्येक सफोला हनी बॉटलमधून ग्राहकांना कोणत्याही भेसळपासून मुक्त आणि अतिरिक्त गोडवा नसलेल्या १०० टक्के मधासह दर्जा व सुरक्षिततेची खात्री मिळते. हे शुद्धता प्रमाणपत्र विशेषत: सध्याच्या काळात महत्त्वपूर्ण बनले आहे. मधामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे गुणधर्म असल्यामुळे ग्राहक मध सेवनाला अधिकाधिक प्राधान्य देत आहेत.
इंडिया सेल्सचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि मॅरिको लिमिटेडच्या नवीन व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिश्रा म्हणाले, ”सफोला हनीची प्रत्येक बॅच दर्जात्मक जर्मन प्रयोगशाळांमध्ये जगातील सर्वात प्रगत चाचण्यांपैकी एक एनएमआर (न्युक्लीअर मॅग्नेटिक रिसॉनन्स) तंत्रज्ञानाचा वापर करत स्वतंत्रपणे चाचणी करण्यात येते. आमचा पारदर्शकतेवर विश्वास आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना आमची चाचणी प्रक्रिया व निष्पत्तींबाबत हमी देतो. ग्राहकांना सफोला हनी सर्टिफिकेट ऑफ प्युरिटी मिळवण्यामध्ये सक्षम करण्याद्वारे आम्ही विश्वसनीयता, दर्जात्मक हमी आणि सार्वजनिक आरोग्य सुरक्षिततेप्रती असलेल्या आमच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.”