सोनी सबने भारताची सर्वात लोकप्रिय मालिका ‘वागले की दुनिया’ला नवीन लुक दिला आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत सोनी सब लवकरच ‘वागले की दुनिया – नयी पीढी, नये किस्से’ सादर करणार आहे. आजच्या मध्यमवर्गीय व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षांना दाखवणारी मालिका क्लासिक व प्रेक्षकांचा आवडता मि. वागलेला सादर करण्यासोबत ‘वागले की दुनिया’च्या नवीन युगाला सादर करते. या मालिकेमध्ये सदाबहार अंजन श्रीवास्तव, भारती आचरेकर आणि वागलेची पुढील पिढी – सुमीत राघवन प्रमुख भूमिकेत आहेत.
सोनी सबवरील मालिका ‘वागले की दुनिया’ने काहीशी झेप घेतली आहे आणि वागले व कुटुंबाच्या नवीन पिढीच्या आजच्या काळामध्ये स्थित आहे. ही आधुनिक, पुरोगामी, जटिल व महत्त्वाकांक्षी भारतातील एका सामान्य पुरूषाची कथा आहे. मूळ सार कायम राखत निर्माण करण्यात आलेली मालिका आजच्या काळाशी सुसंगत आहे.
‘वागले की दुनिया’मध्ये टेलिव्हिजन क्षेत्रातील सुप्रसिद्ध कलाकार असणार आहेत दिग्गज कलाकार, जे त्यांच्या भूमिकांना पुन्हा उजाळा देणार आहेत, जसे श्रीनिवास वागलेच्या भूमिकेत अंजन श्रीवास्तव आणि राधिका वागलेच्या भूमिकेत भारती आचरेकर. अत्यंत प्रतिभावान व अष्टपैलू अभिनेता सुमीत राघवन वागले ज्युनिअर ऊर्फ राजेश वागलेची भूमिका साकारणार आहे आणि अभिनेत्री परिवा प्रणती राजेशची पत्नी म्हणजेच वंदना वागलेची भूमिका साकारणार आहे. कलाकारांमध्ये तरूणाईचा भर करणार आहेत शीहान कपाही व चिन्मय साळवी, जे राजेश व वंदनाची मुले अथर्व व सखी वागलेची भूमिका साकारणार आहेत.
‘वागले की दुनिया – नयी पीढी, नये किस्से’सह पुनरागमन करणारे अभिनेते अंजन श्रीवास्तव व भारती आचरेकर यांचे मत –
श्रीनिवास वागलेची भूमिका साकारताना दिसणारे अंजन श्रीवास्तव म्हणाले, ”वर्षानुवर्षे लोकांनी मला वागले म्हणून ओळखले आहे आणि ‘वागले की दुनिया’ला भरभरून प्रेम दिले आहे. पण यावेळी आम्ही सोनी सबवर ‘वागले की दुनिया’च्या नवीन अवतारासह परतत आहोत. ही मालिका आजच्या सामान्य पुरूषाच्या समस्यांवर प्रकाश टाकेल. मला विश्वास आहे की, प्रत्येकजण या मालिकेशी संलग्न होतील. मला आजही आमचे ते सुवर्ण दिवस आठवतात. पण मला आनंद होत आहे की, माझी सहकारी भारती आचरेकर देखील मालिकेमध्ये आमच्यासोबत असणार आहे.” ते पुढे म्हणाले, ”हे दिग्गज व्यंगचित्रकार व प्रतिष्ठित पत्रकार आर. के. लक्ष्मण यांचे शताब्दी वर्ष असल्यामुळे माझी त्यांना आणि या सदाबहार मालिकेचे दिग्दर्शक स्वर्गीय कुंदन शाह व रवी ओझा यांना मानवंदना देण्याची इच्छा होती. मला हॅट्स ऑफ प्रॉडक्शन्स व सोनी सबसह ‘वागले की दुनिया’च्या नवीन व्हर्जनसह पुनरागमन करण्याची ही संधी मिळाली. मी पुन्हा एकदा आपल्याशा वाटणा-या, हलक्या-फुलक्या व मजेशीर कथांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास उत्सुक आहे.”
राधिका वागलेची भूमिका साकारताना दिसणा-या भारती आचरेकर म्हणाल्या, ”भारतातील सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकेसह पुनरागमन करण्याचा खूप आनंद होत आहे. ‘वागले की दुनिया’ मालिकेने ८० व ९०च्या दशकातील सामान्य व्यक्तीला सादर केले आणि हे नवीन व्हर्जन देखील आजची सामान्य व्यक्ती व त्याच्या समस्यांना सादर करेल. आज प्रत्येकाला घरामध्येच असल्यामुळे कामासंदर्भात समस्या जाणवत आहेत. ‘वागले की दुनिया’चा प्रेक्षकांसाठी पूर्णत: नवीन विश्व सादर करण्याचा मनसुबा आहे, जेथे ते त्यांच्या सर्व चिंता विसरून संकटात देखील आनंदी राहण्यास शिकतील. लोकांनी गेल्या ९ महिन्यांमध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबतच्या नात्याला उजाळा दिला आहे आणि ते या मालिकेशी एका नव्या उंचीसह संलग्न होतील. कोणीतरी नवीन दृष्टिकोनासह ‘वागले की दुनिया’ सादर करण्याचा केलेला प्रयत्न पाहून मला खूप आनंद झाला आहे. मी निश्चितपणे सांगू शकते की, ते या मालिकेला न्याय देत आहेत.”